Matthew Perry च्या निधनानंतर अभिनेत्याची  शेवटची इंस्टा पोस्ट वायरल
Matthew Perry (Photo Credits: X)

अभिनेता Matthew Perry च्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टने त्याचे सारे फॅन्स हळहळले आहे. 54 वर्षीय Matthew Perry काल त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेमध्ये आढळून आला आहे. jacuzzi मध्ये त्याचा मृतदेह आढळला आहे. Los Angeles मधील त्याच्या घरीच ही घटना आहे. विचित्र योगायोग म्हणजे अवघ्या 5 दिवसांपूर्वीच Matthew Perry ने एका चांदण्या रात्री घरातच jacuzzi मधील फोटो शेअर केला होता. आज त्याच्या मृत्यूनंतर हाच फोटो सोशल मीडीयामध्ये झपाट्याने वायरल देखील होत आहे.

“Oh, so warm water swirling around makes you feel good? I'm Mattman.” या कॅप्शन सह त्याने फोटो शेअर केला होता. फोटो मध्ये तो आरामात बसला होता. त्याच्या मागे वर्दळीचा शहराचा नजारा देखील दिसत आहे. Matthew Perry Dead: फ्रेंडर्स मालिकेतील 'या' प्रसिध्द अभिनेत्याचा मृत्यू, लॉस एंजेलिस येथील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास .

Matthew Perry ची शेवटची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Matthew Perry (@mattyperry4)

जगभरामध्ये लोकप्रिय सीरीज 'फ्रेंड्स' मध्ये Matthew Perry ने चॅंडलरची भूमिका साकारली आहे. त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

2  तास आधी पिकलबॉल चे दोन राऊंड खेळून LA च्या घरी परतल्यानंतर मॅथ्यूचा मृत्यू झाला. TMZ च्या अहवालानुसार, त्याने त्याच्या असिस्टंटला एका कामावर पाठवले होते. सुमारे दोन तासांनंतर असिस्टंट  परत आला आणि त्याला पेरी जकूझीमध्ये प्रतिसाद देत नसल्याचे आढळले आणि आपत्कालीन मदतीसाठी 911 डायल केला. अहवालानुसार, घटनास्थळी कोणतेही औषध सापडले नाही. कोणतीही संशयास्पद गोष्ट घडलेली नाही. त्याच्या मृत्यूचा तपास सुरू आहे