IPL Auction 2025 Live

Vikram-S Missile: भारतातील पहिले खाजगी क्षेत्रातील रॉकेट 'विक्रम-एस' 15 नोव्हेंबरला होणार लॉन्च

हैदराबादस्थित स्पेस स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसने (Skyroot Aerospace) यासंदर्भात घोषणा केली आहे.

Vikram-S Missile (PC - Twitter @SkyrootAerospace)

Vikram-S Missile: अंतराळ क्षेत्रात भारताने अनेक यश संपादन केले आहे. अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीप्रमाणेच आता भारतही खासगी अवकाश क्षेत्रात आपले कौशल्य दाखवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) 15 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील लॉन्चपॅडवरून त्यांचे पहिले खाजगीरित्या विकसित रॉकेट विक्रम-एस (Vikram-S) प्रक्षेपित करणार आहे. हैदराबादस्थित स्पेस स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसने (Skyroot Aerospace) यासंदर्भात घोषणा केली आहे.

भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित रॉकेट 'विक्रम-एस' हे स्कायरूट एरोस्पेसचे पहिले मिशन आहे. ज्याला प्रारंभ (Prarambh) असे नाव देण्यात आले आहे. या मिशनमध्ये दोन भारतीय आणि एक परदेशी ग्राहकांचा पेलोड असेल. स्कायरूट एरोस्पेस (Skyroot Aerospace) ने शुक्रवारी एक निवेदन जारी केले की, “हृदयाचे ठोके वाढले आहेत. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पृथ्वी ऐकत आहे. याचे प्रक्षेपण 15 नोव्हेंबर 2022 ला होईल." (हेही वाचा - Twitter Blue Tick: ट्विटर ब्लू टीक सबस्क्रिप्शन $8/महिनाचा निर्णय रद्द? ट्विटरवरुन ब्लू टिक व्हेरिफिकेशन ऑप्शनचं अचानक गायब)

स्कायरूट एरोस्पेसचे सीईओ आणि सह-संस्थापक पवन कुमार चंदना यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, क्षेपणास्त्र प्रक्षेपण सकाळी 11:30 वाजता होईल. भारतातील पहिली खाजगी अंतराळ कंपनी रॉकेट प्रक्षेपण मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. भारताच्या अवकाश क्षेत्रासाठी ही एका नव्या युगाची सुरुवात असेल.

विक्रम-एस क्षेपणास्त्र -

भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांना श्रद्धांजली म्हणून स्कायरूटच्या प्रक्षेपण वाहनाला 'विक्रम' असे नाव देण्यात आले आहे. विक्रम-एस रॉकेट हे सिंगल-स्टेज सब-ऑर्बिटल लॉन्च व्हेईकल आहे. जे तीन ग्राहक पेलोड वाहून नेईल आणि विक्रम सीरिजमधील स्पेस लॉन्च व्हेइकल्समधील बहुतेक तंत्रज्ञानाची चाचणी आणि प्रमाणीकरण करण्यात मदत करेल. 'विक्रम' मालिकेत विक्रम I, II आणि III असे तीन रॉकेट आहेत. हे रॉकेट्स ब्रॉडबँड इंटरनेट, जीपीएस आणि आयओटी यांसारख्या दळणवळण सेवांना स्पेस आणि पृथ्वी इमेजिंगला सपोर्ट करेल.

स्कायरूट एरोस्पेस कंपनी -

स्कायरूट एरोस्पेस ही हैदराबाद येथील खाजगी कंपनी आहे. स्कायरूट हे पहिले स्टार्टअप आहे. ज्याने रॉकेट लॉन्च करण्यासाठी इस्रोसोबत सामंजस्य करार केला. परवडणाऱ्या आणि कमी किमतीच्या अंतराळ उड्डाणातील प्रवेशातील अडथळे दूर करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.