‘Chakshu’ And ‘DIP’ Platforms: 'चक्षु' आणि 'डीआयपी' पोर्टल आहे तरी काय? सायबर फसवणूक टाळण्यासाठी घ्या जाणून
सायबर सुरक्षा (Cyber Security) बळकट करण्यासाठी आणि ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी भारत सरकारने संचार साथी उपक्रमांतर्गत चक्षु पोर्टलचे (Chakshu Portal), डीआयपी प्रणालीचे (DIP Portal) अनावरण केले आहे.
सायबर सुरक्षा (Cyber Security) बळकट करण्यासाठी आणि ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी भारत सरकारने संचार साथी उपक्रमांतर्गत चक्षु पोर्टलचे (Chakshu Portal), डीआयपी प्रणालीचे (DIP Portal) अनावरण केले आहे. हा उपक्रम वापरकर्त्यांना फसवे कॉल, लॉटरी घोटाळे, नोकरीच्या ऑफर आणि व्यवसायांद्वारे फोन नंबरच्या संभाव्य लीकसह संशयास्पद कृतींची तक्रार करण्यास सक्षम करतो. केंद्रीय IT आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी या नव्या प्रणालीची घोषणा नुकतीच केली. देशभरात होत असलेली डिजिटल क्रांती आणि त्या दरम्यानच वाढलेली सायबर गुन्हेगारी यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार महत्त्वाची पावले टाकता आहेत. संचार साथी चक्षु उपक्रम हा देखील त्यातलाच भाग आहे.
चक्षु पोर्टल कशासाठी?
चक्षु पोर्टल, संचार साथी उपक्रमाचा एक महत्त्वाचा घटक आहे. डिजिटल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म वापरुन वापरकर्त्याला म्हणजेच युजर्सला त्रास देणारे सायबर गुन्हेगार, त्यांचे सायबर क्राईम आणि फसव्या कारवायांविरुद्ध गंभीर उपाययोजना करणे आणि या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी हा मंच सक्रीय भूमिका बजावेल. पाठिमागील नऊ महिन्यांत फसवणुकीशी संबंधीत अनेक घटनांमध्ये 1 कोटींहून अधिक मोबाइल क्रमांक आधीच डिस्कनेक्ट करून, गुन्हेगारांविरुद्ध त्वरीत कारवाई करण्याची हे पोर्टल खात्री देते, असे पोर्टलबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले. (हेही वाचा, Investment Scam: गुंतवणूक घोटाळा; 73 वर्षीय उद्योजकाची 3.6 कोटी रुपयांची फसवणूक; कापड कारखाना मालकास अटक)
DIP म्हणजे काय?
दरम्यान, दूरसंचार विभागाने सुरू केलेला आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म (DIP), ज्याचा उद्देश कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी, बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये फसवणुकीचा सर्वसमावेशकपणे सामना करण्यासाठी सहकार्य वाढवणे आहे. मंत्री वैष्णव यांनी सायबर फसवणूक शोधण्यात आणि रोखण्यात Chakshu आणि DIP च्या कार्यक्षमतेबद्दल आशावाद व्यक्त केला, ज्यामुळे देशाची सायबर सुरक्षा फ्रेमवर्क मजबूत होईल. फसवणुकीने हस्तांतरित केलेल्या निधीची वसुली करण्यासाठी आणि गुंतलेली खाती गोठवण्याच्या उपाययोजनांसह तपास त्वरित केला जाईल. याच काळात फसवणुकीसाठी वापरण्यात आलेले १७ लाख मोबाइल क्रमांक ब्लॉक करण्यात आल्याचा खुलासाही वैष्णव यांनी केला आहे. (हेही वाचा, Chakshu Portal: सायबर क्राईम मध्ये स्पॅम फोन, SMS, WhatsApp द्वारा फसवणूक करणार्यांवर चाप बसवण्यासाठी सरकारकडून नवं चक्षू पोर्टल)
दळणवळण राज्यमंत्री, देवुसिंह चौहान यांनी सायबर सुरक्षा धोक्यांचा सामना करण्यासाठी दूरसंचार विभागाचे कौतुक करत विकसित होत असलेल्या फसवणुकीला संबोधित करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या प्रकल्पांवर प्रकाश टाकला. दूरसंचार सचिव नीरज मित्तल यांनी नागरिकांच्या डिजिटल मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी चक्षु पोर्टल आणि डीआयपीच्या महत्त्वावर भर दिला, ज्यामुळे फसव्या पद्धतींपासून देशाच्या संप्रेषण पायाभूत सुविधा सुरक्षित करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती झाल्याचे त्यांनी म्हटले.