तुम्हीबी माल्यासारखं इग्लंडमध्येच ऱ्हावा; रवि शास्त्रीवर भडकले क्रिकेटप्रेमी

त्यामुळे क्रिकेट चाहते भलतेच नाराज झाले आहेत.

(Photo Credit-PTI)

इंग्लंडसोबत झालेल्या क्रिकेट मालिकेत भारतीय संघ तर पराभूत झाला. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारती संघाची कामगिरी अत्यंत वाईट राहिली. भारती संघ जेव्हा, इंग्लंड दौऱ्यावर पोहोचला तेव्हा, आशा व्यक्त केली जात होती की, भारतीय संघ इंग्लंडला भारी पडेल. पण, झाले उलटेच. तरीसुद्धा बीसीसीआयने खेळाडू आणि प्रशिक्षकांना सेंट्रल काँट्रॅक्ट रिटेनर फी दिलेली आहे. बीसीसीआयने संघप्रशिक्षक आणि काही खेळाडूंना आणि इतर स्टाफला अगाऊ रक्कमही दिली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते भलतेच चिडले असून, त्यांनी प्रशिक्षक रवि शास्त्रींना सोशल मीडीयवर ट्रोल केले आहे.

इंग्लंडकडून भारताला दुसऱ्यांदा सलग पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते भलतेच नाराज झाले आहेत. या नाराजीचा सामना भारतीय क्रिकेट टीम आणि प्रशिक्षक रवि शास्त्री यांनाही करावा लागतो आहे. चाहते खास करून ट्विटर आणि सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर प्रशिक्षक रवि शास्त्री ट्रोल झाल्याचे पहायला मिळात आहे. काही चाहत्यांनी तर आपली नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त करत, 'विजय माल्याप्रमाणे तुम्हीही इंग्लंडमध्येच राहा', असा सल्ला शास्त्रींना दिला आहे.

क्रिकेट रसिक सुरेश मोहन लिहितात,'मला वाटते की, रवि शास्त्री लवकरच कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचतील'. दुसरा एक क्रिकेट चाहता म्हणतो की, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड खरे उत्कृष्ट प्रशिक्षक आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif