Yashasvi Jaiswal New Record: यशस्वी जैस्वालने घरच्या मैदानावर रचला इतिहास, गुंडप्पा विश्वनाथ- सुनील गावस्कर यांचा विक्रम काढला मोडीत

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याने ही कामगिरी केली. यशस्वी जैस्वालने पुणे कसोटीच्या दुसऱ्या डावात 65 चेंडूत 77 धावांची खेळी केली.

Yashasvi Jaiswal (Photo Credit - X)

IND vs NZ 2nd Test 2024: टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) पुणे कसोटीत (Pune Test) इतिहास रचला आहे. यशस्वी जैस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला आहे. भारतातील देशांतर्गत कसोटीत एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याने ही कामगिरी केली. यशस्वी जैस्वालने पुणे कसोटीच्या दुसऱ्या डावात 65 चेंडूत 77 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने नऊ चौकार आणि तीन षटकार मारले. (हे देखील वाचा: Yashasvi Jaiswal Milestone: यशस्वी जैस्वालने पुणे कसोटीत केला मोठा पराक्रम, जो रूटच्या खास क्लबमध्ये केली एन्ट्री)

यशस्वी जैस्वालने गुंडप्पा विश्वनाथला मागे सोडले

जैस्वालने 2024 मध्ये भारतातील देशांतर्गत कसोटी सामन्यांमध्ये 1051 धावा केल्या आहेत, जे भारतातील एका कॅलेंडर वर्षात एका खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. जैस्वाल यांनी गुंडप्पा विश्वनाथच्या 1979 मध्ये केलेल्या 1047 धावा मागे टाकल्या आहेत. सुनील गावस्करच्या नावावर 1013 धावा आहेत. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारखे महान फलंदाजही हा पराक्रम करू शकले नाहीत. घरच्या मैदानावर एका कॅलेंडर वर्षात 1000 हून अधिक धावा करणारा जयस्वाल जगातील सातवा फलंदाज आहे.

एका कॅलेंडर वर्षात घरच्या कसोटीत 1000+ धावा

1047- गुंडप्पा विश्वनाथ (1979)

1013- सुनील गावस्कर (1979)

1058- ग्रॅहम गूच (1990)

1012- जस्टिन लँगर (2004)

1126- मोहम्मद युसूफ (2006)

1407- मायकेल क्लार्क (2012)

1051- यशस्वी जैस्वाल (2024)

यशस्वी जैस्वालने सेहवागचा विक्रम मोडला

भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल हा भारतात सर्वात जलद 1000 धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने वीरेंद्र सेहवागला मागे टाकले. जैस्वालने 1315 चेंडूत 1000 धावा पूर्ण केल्या. 1438 चेंडूत 1000 धावा करण्याचा विक्रम सेहवागच्या नावावर होता.

Tags

New Zealand New Zealand National Cricket Team India National Cricket Team Maharashtra Cricket Association Stadium Pune IND vs NZ 2nd Test India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test Rohit Sharma Team India Team India vs New Zealand Test Serie न्यूझीलंड न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी कसोटी भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ पुणे पुणे कसोटी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम रोहित शर्मा टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका ind वि NZ भारत वि न्यूझीलंड भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ वि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ India national cricket team vs New Zealand national cricket team match scorecard IND vs NZ 2nd Test 2024 new zealand national cricket team vs india national cricket team match scorecard Yashasvi Jaiswal New Record यशस्वी जैस्वाल नवीन रेकॉर्ड