IND vs WI T20I Series: टीम इंडियाचा मोठा विक्रम धोक्यात, टी-20 मालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागेल
या सामन्यात, भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा (Central Broward Regional Park Stadium Turf Ground, Lauderhill, Florida) येथे दोन्ही संघांमध्ये सामना होईल.
टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सात विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला. या विजयासह टीम इंडियाची मालिका अजूनही अबाधित आहे. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना उद्या म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सामन्यात, भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा (Central Broward Regional Park Stadium Turf Ground, Lauderhill, Florida) येथे दोन्ही संघांमध्ये सामना होईल.
रेकॉर्डवर नजर टाकली तर, हा सामना जरी संघाने जिंकला तरी रविवारी म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या शेवटच्या टी-20 सामन्यात विश्वासार्हता पणाला लागेल. कारण टीम इंडियाचा सर्वात मोठा विक्रम धोक्यात आला आहे. खरं तर टीम इंडियाची पाच सामन्यांची ही पाचवी टी-20 मालिका आहे. याआधी टीम इंडियाने चारही वेळा विजय मिळवला आहे. (हे देखील वाचा: IND vs WI 4th T20I: टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चोथा टी-20 सामना होणार फ्लोरिडामध्ये, येथे जाणून घ्या मैदानाची आकडेवारी)
गेल्या वर्षी टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका त्यांच्याच भूमीवर 4-1 अशी जिंकली होती. मात्र यावेळी संघावर पराभवाचे सावट दिसत आहे. इथून झालेली एक चूक टीम इंडियाचा हा मोठा रेकॉर्ड नष्ट करू शकते. याआधी टीम इंडियाने न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांना पाच टी-20 सामन्यांच्या चार मालिकेत पराभूत केले होते.
5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा असा आहे रेकॉर्ड
याआधी टीम इंडियाने खेळलेल्या 5 सामन्यांच्या चार टी-20 मालिकेपैकी तीन वेळा संघाने विजय मिळवला आहे आणि एक मालिका अनिर्णित राहिली आहे. म्हणजेच पहिल्यांदाच टीम इंडिया आता बॅकफूटवर दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चालू मालिकेत इथून एकही पराभव टीम इंडियाचा हा विक्रम बिघडू शकतो.
आकडेवारीवर एक नजर
- टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (2019-20): टीम इंडियाने मालिका 5-0 ने जिंकली
- टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (2020-21): टीम इंडियाने मालिका 3-2 ने जिंकली
- टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2022): मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली
- टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज (2022): टीम इंडियाने मालिका 4-1 ने जिंकली
टी-20 मालिका रोमांचक वळणावर
टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज क्रिकेट संघ यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचे दोन सामने 12 आणि 13 ऑगस्ट रोजी सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, फ्लोरिडा येथे खेळले जातील. याआधी टीम इंडियाने पहिला सामना एका रोमांचक वळणावर 4 धावांनी गमावला होता. त्याचवेळी दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही टीम इंडियाला 2 विकेट्सने सामना गमवावा लागला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात संघाने दमदार पुनरागमन करत वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव करत मालिका 1-2 अशी पिछाडीवर आहे.