CSK Vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या पराभवाला जबाबदार कोण? चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने केले स्पष्ट

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 2021) 27व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सला (CSK Vs MI) 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात 20 षटकात 219 धावांचे लक्ष्य उभारलेल्या चेन्नईला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

एमएस धोनी (Photo Credit: Twitter/IPL)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 2021) 27व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सला (CSK Vs MI) 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात 20 षटकात 219 धावांचे लक्ष्य उभारलेल्या चेन्नईला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. चेन्नईने या हंगामात सलग 5 सामने जिंकले होते. परंतु, मुंबई विरुद्ध खेळण्यात आलेल्या सातव्या सामन्यात त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. या सामन्यात मोठी धावसंख्या उभारुनही पराभव झाल्याने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) नाराज झाला आहे. या पराभवानंतर धोनीने ही नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

मुंबई विरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर धोनी म्हणाला की, या सामन्यात गोलंदाजीपेक्षा आमची फिल्डिंग खराब झाली आहे. चेन्नईच्या संघाने अगदी मोक्याच्या क्षणी कॅच सोडले आहेत. ही एक मोठी स्पर्धा आहे. सध्या तरी आमची नजर पॉईंट टेबलवर नाही. आम्ही एकावेळी एकाच मॅचचा विचार करत आहोत आणि त्या पद्धतीने तयारी करत आहोत," असे धोनीने सांगितले आहे. हे देखील वाचा- IPL 2021, MI vs CSK: मैदानावरील शौर्यानंतर Kieron Pollard चं ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर 'असं' झालं स्वागत; विरोधकांना दिलं प्रतिउत्तर, पाहा व्हिडिओ

या सामन्यात चेन्नईचा फाफ ड्यू प्लेसिसने शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर कायरन पोलार्डचा कॅच सोडला होता. ड्यू प्लेसिस हा चेन्नईचाच नाही तर, जगातील सर्वोत्तम फिल्डरपैकी एक आहे. त्याने सोडलेला हा कॅच चेन्नईच्या पराभवात निर्णयाक ठरला. भरवशाच्या फिल्डरनंच कॅच सोडल्याने निराश झालेल्या धोनीने त्याची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. महत्वाचे म्हणजे, कायरन पोलार्डचा कॅच सोडला नसता तर, कदाचित चेन्नईच्या झोळीत आणखी एक विजय पडला असता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

PRS vs MLR BBL 2024-25 Dream11 Team Prediction: पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम11 संघ जाणून घ्या

ICC Ranking: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाला मोठा फटका; आयसीसी क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर घसरला

Perth Scorchers vs Melbourne Renegades BBL 2025 Live Streaming: पर्थ स्कॉर्चर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात चुरशीचा सामना; भारतात सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या

South Africa vs Pakistan, 2nd Test Day 3 Stumps Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, पाकिस्तानला पराभवाचा धोका, शान मसूदने दुसऱ्या डावात झळकावले नाबाद शतक

Share Now