IND vs ENG 1st Test Live Streaming: भारत आणि इंग्लंडमधील पहिला कसोटी सामना तुम्ही कधी अन् कुठे पाहणार? जाणून एका क्लिकवर संपूर्ण तपशील
पहिला कसोटी सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहणार जाणून घेवूया.
IND vs ENG Test Series 2025: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघादरम्यान 20 जूनपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला (IND vs ENG 1st Test) सुरूवात होणार आहे. यासोबतच टीम इंडिया आणि इंग्लंड संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC) च्या नवीन हंगामाची सुरुवातही करणार आहेत. पहिला कसोटी सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहणार जाणून घेवूया.
कुठे पाहणार लाइव्ह सामना?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना दुपारी 3.30० वाजता सुरू होईल. तर सामन्याचा टॉस दुपारी 3.00 वाजता होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. तर, चाहते जिओहॉटस्टारवर सामना मोफत पाहू शकतील. ते वेबसाइटवरही हा सामना मोफत पाहू शकतील. (हे देखील वाचा: IND vs ENG 1st Test 2025: ऋषभ पंत एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर, असा पराक्रम करणारा ठरणार पहिला भारतीय फलंदाज)
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दोन्ही संघ
भारत: अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, यशस्वी जैस्वाल, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत, केएल राहुल, ध्रुव जुरेल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अरदीप सिंग, अरदीप सिंग, अरविंद, अरविंद, अरविंद, कृष्णा, कृष्णा. हर्षित राणा
इंग्लंड (पहिल्या कसोटीसाठी): बेन डकेट, जो रूट, जॅक क्राउली, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेकब बेथेल, ख्रिस वोक्स, ऑली पोप, जेमी स्मिथ, सॅम्युअल कुक, ब्रायडन कार्स, शोएब बशीर, जोश टंग, जेमी ओव्हरटन
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)