India vs West Indies ODI 2018: मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम मोडण्याची कोहलीला 'विराट' संधी

भारत पहिला एकदिवसीय सामना २१ ऑक्टोबरला गुवाहाटी येथे खेळणार आहे.

Virat Kohli and Sachin Tendulkar | File Image | (Photo Credits- PTI)

वेस्टइंडीज संघाला कसोटी मालिकेत २-० ने  धूळ चारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचं लक्ष आता एकदिवसीय मालिकेकडे वळले आहे. कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकेत सुद्धा भारताकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार विराट कोहली सुद्धा  दमदार फोर्मात असून आता त्याला सचिन तेंडूलकरच्या रेकॉर्डचे वेध लागले आहेत. आगामी एकदिवसीय मालिकेत विराट कोहली वेस्टइंडीज विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाला मागे टाकू शकतो.

सचिनने वेस्टइंडीज विरुद्ध ३९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५२.७३ च्या सरासरीने १५७३ धावा केल्या आहेत. तर विराटने २७ सामन्यांमध्ये ६०.३० च्या सरासरीने १३८७ धावा केल्या आहेत. कोहलीला केवळ १८७ धावांची आवश्यकता आहे. नक्की वाचा:  ICC Test Rankings 2018: भारत पहिल्या स्थानावर कायम; विराट कोहलीसुद्धा फलंदाजीत No. 1.

तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार राहुल द्रविड असून त्याने ४० सामन्यांमध्ये १३४८ धावा केल्या आहेत. तर सौरभ गांगुली ११४२ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. भारत पहिला एकदिवसीय सामना २१ ऑक्टोबरला गुवाहाटी येथे खेळणार आहे.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद

NZ Beat ENG 3rd Test 2024 Scorecard: तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 423 धावांनी केला पराभव, मिशेल सँटनर ठरला विजयाचा हिरो; टीम साऊदीला मिळाल शानदार निरोप

IND vs AUS 3rd Test 2024: ना ओपनिंग, ना मिडल ऑर्डर.. गाबामध्येही रोहित फ्लॉप, चाहत्यांकडून निवृत्तीवर प्रश्न उपस्थित