World Cup 2019: IND vs SL सामन्यात बाउंड्री लाईन वर आराम करताना दिसला युझवेन्द्र चहल, यूजर्सने गमतीशीर मिम्सद्वारे केले ट्रोल

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात युझवेन्द्र चहल सीमा रेषेजवळ आराम करताना दिसत होता आणि ह्याचे फोटोज देखील सोशल मीडियावर वायरल झाले आहे. आणि आता चाहते त्याला ट्रोल करत मजा घेत आहे.

(Photo Credits: Twitter)

आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये श्रीलंका (Sri Lanka) विरूद्ध सामन्यात भारतीय संघात (Indian Team) युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal) च्या जागी कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहेत. चहल प्लेयिंग इलेव्हनमध्ये नसतानाही आपल्या मजेदार अंदाजाने चाहत्याने मनोरंजन करत आहे. आणि त्यांचे लक्ष आपल्याकडे ओढून घेण्यात चहल याला यश देखील प्राप्त झाले आहेत. श्रीलंका संघाची फलंदाजी सुरु असताना युझवेन्द्र चहल सीमा रेषेजवळ आराम करताना दिसत होता आणि ह्याचे फोटोज देखील सोशल मीडियावर वायरल झाले आहे. आणि आता चाहते त्याला ट्रोल करत मजा घेत आहे. (ICC World Cup 2019: IND vs SL मॅचमध्ये रवींद्र जडेजा याने घेतली विकेट आणि ट्रोल झाले संजय मांजरेकर, जाणून घ्या कारण)

चाहत्यांनी चहलच्या वायरल झालेल्या फोटोजचे मिम्स बनवून शेअर करत आहे. हे मिम्स इतके मजेशीर आहेत की तुम्हाला देखील हसण्यास भाग पाडले जाईल. दम्यान, यंदाच्या विश्वचषकमध्ये चहलने 11 विकेट्स घेतले आहेत. पहा हे गमतीशीर ट्विट्स:

श्रीलंका विरुद्ध सामन्याबद्दल बोललेले तर, पहिले फलंदाजी करत श्रीलंकाने भारतासमोर 265 धावांचे आव्हान ठेवले आहे. श्रीलंकेसाठी अँजेलो मॅथ्यूज याने सर्वाधिक 113 धावा केल्या. धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या सलामी जोडी, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के. एल राहुल (KL Rahul) ने दमदार सुरुवात केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement