IND vs AUS 4th Test 2024 Day 3 Stumps Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, नितीश कुमार रेड्डीच्या शतकामुळे भारत 358/9, ऑस्ट्रेलियापेक्षा 116 धावांनी मागे
दिवसाअखेल भारताने 9 विकेट गमावून 358 धावा केल्या आहे. भारत अजूनही यजमान संघापेक्षा 116 धावांनी मागे आहे. भारताकडून नितीन कुमार रेड्डीने कसोटीतील पहिले शतक ठोकले. तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कॅमिन्स आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.
Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND s AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. 3 सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसऱ्या खेळाचा दिवस संपला आहे. दिवसाअखेल भारताने 9 विकेट गमावून 358 धावा केल्या आहे. भारत अजूनही यजमान संघापेक्षा 116 धावांनी मागे आहे. भारताकडून नितीन कुमार रेड्डीने कसोटीतील पहिले शतक ठोकले. तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कॅमिन्स आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 आटोपला
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 4 फलंदाजांच्या अर्धशतक आणि स्टीवन स्मिथच्या 140 धावांच्या जोरावर दुसऱ्या दिवशी 474 धावांवर केल्या. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर कॉन्स्टास 60 आणि उस्मान ख्वाजा 57 धावा करून बाद झाला. मार्नस लॅबुशेन 72 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्टीव्हन स्मिथ पॅट कॅमिन्स यांनी 112 धावांची भागीदारी रचली. पॅट कॅमिन्स 40 आणि स्मिथ 140 धावा करुन बाद झाला. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 4 तर रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले. याशिवाय आकाश दीप 2 आणि वॉशिंग्टन सुंदरनेही एक विकेट घेण्यात यश मिळवले.
नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरने रचली 127 धावांची भागीदारी
यानंतर भारतीय डावाला सुरुवात झाली. सुरुवात चांगली झाली नाही, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांच्यात शतकी भागीदारी झाली, पण यशस्वी धावबाद होताच विराट कोहलीही चालायला लागला. रोहित शर्माची बॅट पुन्हा फ्लॉप झाली. केएल राहुल उत्कृष्ट चेंडूवर बाद झाला. यशस्वी जैस्वालच्या बॅटमधून 82 धावा निघाल्या.
नितीश कुमार रेड्डीचे शानदार शतक
तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत 28, रवींद्र जडेजा 17 धावांवर स्वस्तात बाद झाले. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हातात कमान घेतली. दोघांनी 127 धावांची भागीदारी रचली. वॉशिंग्टन सुंदर 162 चेंडूचा सामना करुन 50 धावा करुन बाद झाला. आणि नितीश कुमार रेड्डीने शानदार शतक झळकावून नाबाद आहे. त्यासोबत 2 धावा करुन क्रीजवर उभा आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून पॅट कॅमिन्स आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या आहे. नॅथन लिऑनने 2 विकेट घेतल्या आहे.