ODI World Cup Schedule 2023: भारत-पाक विश्वचषक सामन्याबाबत वेळापत्रकात होणार मोठे बदल, जय शाह यांनी दिली माहिती
याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी मोठे विधान केले आहे की, 2-3 क्रिकेट मंडळांनी वेळापत्रकात बदल करण्याबाबत सांगितले आहे आणि ते लवकरच जाहीर केले जाईल.
IND vs PAK: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) काही काळापूर्वी भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकाचे (ODI World Cup 2023) अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. आता 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मेगा इव्हेंटच्या कार्यक्रमात काही बदल झाल्याच्या बातम्या येत आहेत. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी मोठे विधान केले आहे की, 2-3 क्रिकेट मंडळांनी वेळापत्रकात बदल करण्याबाबत सांगितले आहे आणि ते लवकरच जाहीर केले जाईल. भारतीय संघाला आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या मैदानावर खेळायचा आहे. याशिवाय 15 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्धच्या (IND vs PAK) सामन्याच्या तारखेत बदल झाल्याची बातमी समोर येत आहे.
जय शाह यांनी दिली माहिती
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी वेळापत्रकातील बदलाबाबत एएनआयला दिलेल्या निवेदनानुसार, जर भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली तर एकापेक्षा जास्त सामन्यांच्या तारखेत बदल होऊ शकतो. 15 ऑक्टोबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान सामना हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे, अशा परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांनी या सामन्याच्या तारखेत बदल करण्याचे सांगितले आहे. त्यावर लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल. (हे देखील वाचा: India Beat West Indies: भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून मिळवला विजय, मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी)
फक्त तारीख बदलेल, स्थळ नाही
बीसीसीआयच्या वतीने जय शाह यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की जर भारत-पाकिस्तान सामन्याचे वेळापत्रक बदलले तरच त्याची तारीख बदलली जाईल, स्थळ नाही. वृत्तानुसार, पुढील 2 ते 3 दिवसांत आयसीसीकडून नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल.