IND vs ENG 1st Test 2025 Day 1 Stumps: टीम इंडियाने इंग्लंडला धूतला, लीड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी गिल आणि जयस्वालचे शतक; भारत 400 धावांच्या उंबरठ्यावर!
पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने दिवसाअखेर तीन विकेट गमावून पहिल्या डावात 359 धावा केल्या आहे. भारताकडून कर्णधार शुभमन गिल 127 तर ऋषभ पंत 65 धावांवर खेळत आहे.
India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघादरम्यान पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जात आहे. यासोबतच टीम इंडिया आणि इंग्लंड संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC) च्या नवीन हंगामाची सुरुवातही केली आहे. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने दिवसाअखेर तीन विकेट गमावून पहिल्या डावात 359 धावा केल्या आहे. भारताकडून कर्णधार शुभमन गिल 127 तर ऋषभ पंत 65 धावांवर खेळत आहे. (हे देखील वाचा: Shubman Gill Century: कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शुभमन गिलने रचला इतिहास, शतक झळकावून विराट-गावसकर यांच्याशी केली बरोबरी)
This young Indian team has DOMINIATED and how!#ENGvIND SCORECARD ⏩ https://t.co/ShJazRf4lJ pic.twitter.com/5aUxb4ep7T
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 20, 2025
भारताची दमदार सुरुवात
त्याआधी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात दमदार सरुवात केली. सलामीसाठी आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालने पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. केएल राहुल (42) बाद झाल्यानंतर लगेचच कसोटी सामन्यात पदार्पण करणारा साई सुदर्शन शुन्यावर बाद झाला. त्यानंतर लंच ब्रेकनंतर कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालने डाव सांभळला.
यशस्वी आणि गिलचे शानदार शतक
लंच ब्रेकनंतर गिल आणि जयस्वालने 120 धावांची भागादारी केली. यादरम्यान जयस्वाल 159 चेंडूत 101 धावा करुन बाद झाला. त्याने 16 चौकार आणि 1 षटकारासह शतक पूर्ण केले. त्यानंतर पंत आणि गिलने संघाची धुरा हाती घेतली. त्या दोघांनी मिळून पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 138 धावांची भागीदारी रचली. यादरम्यान, कर्णधार शुभमन गिलने आपले शानदार शतक पुर्ण केले. तर ऋषभ पंतने अर्धशतक पुर्ण केले. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सेने 1 आणि बेन स्टोक्सला 2 विकेट घेतल्या.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर
(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2025 11:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

