Shubman Gill Century: कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शुभमन गिलने रचला इतिहास, शतक झळकावून विराट-गावसकर यांच्याशी केली बरोबरी

रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर शुभमन गिलला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत तो कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत आहे. या सामन्यात त्याने 140 चेंडूत शतक पूर्ण केले.

Shubman Gill Century: कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शुभमन गिलने रचला इतिहास, शतक झळकावून विराट-गावसकर यांच्याशी केली बरोबरी
𝗦𝗛𝗨𝗕𝗠𝗔𝗡 𝗚𝗜𝗟𝗟 (Photo Credit- X)

India vs England 1st Test 2025: शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले (Shubman Gill Century) आहे. कर्णधार म्हणून ही त्याची पहिलीच कसोटी खेळी होती, ज्यामध्ये त्याने शतक झळकावून इतिहास रचला आहे. कर्णधार म्हणून पदार्पणाच्या कसोटी डावात शतक झळकावणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहली, सुनील गावस्कर आणि विजय हजारे यांनी हा विक्रम केला आहे. रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर शुभमन गिलला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत तो कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत आहे. या सामन्यात त्याने 140 चेंडूत शतक पूर्ण केले.

कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी डावात शतक झळकावणारा भारतीय

कर्णधार म्हणून पदार्पणाच्या कसोटी डावात शतक झळकावणारा पहिला भारतीय विजय हजारे होते, ज्यांनी 1951 मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद 164 धावा केल्या. त्यांच्यानंतर सुनील गावस्कर यांनी 1976 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी डावात 116 धावा केल्या. विराट कोहलीने 2014 मध्ये कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्याने पहिल्याच डावात 115 धावा केल्या. आता शुभमन गिलचाही या दिग्गजांच्या यादीत समावेश झाला आहे.

हे देखील वाचा: Yashasvi Jaiswal New Record: इंग्लंडच्या भूमीवर यशस्वी जयस्वालचा धमाका, 11 वर्षांनंतर घडला असा पराक्रम, दिग्गजांच्या यादीत सामील!

शुबमन गिलने 2000 कसोटी धावा केल्या पूर्ण 

कसोटी क्रिकेटमध्ये शुभमन गिल क्रमांक-4 वर फलंदाजी करत आहे हे पहिलेच वेळा आहे. पूर्वी विराट कोहली या स्थानावर फलंदाजी करायचा, परंतु आता तो निवृत्त झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी शुभमन गिलने त्याच्या 32 सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत 1893 धावा केल्या होत्या. आता इंग्लंडविरुद्ध 107 धावा करून त्याने कसोटी स्वरूपात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने त्याच्या 60 व्या कसोटी डावात ही कामगिरी केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2025 11:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).