IPL Auction 2025 Live

T20 World Cup 2021 Warm-up Schedule: विश्वचषक सराव सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा, ‘या’ दोन संघांशी भिडणार टीम इंडिया, पहा संपूर्ण शेड्युल

पात्रता फेरीत आठ संघ 17 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत लढतील. अव्वल आठ संघ आधीच सुपर 12 फेरीसाठी पात्र ठरले आहेत आणि या दरम्यान ते सराव सामन्यासाठी मैदानात उतरतील. या मोठ्या स्पर्धेपूर्वी आयसीसीने सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ची 14 वी आवृत्ती सुरु असताना, यूएई  (UAE) बहुप्रतिक्षित टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. पात्रता फेरीत आठ संघ 17 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत लढतील. अव्वल आठ संघ आधीच सुपर 12 फेरीसाठी पात्र ठरले आहेत आणि या दरम्यान ते सराव सामन्यासाठी (Warm-up Matches) मैदानात उतरतील. या मोठ्या स्पर्धेपूर्वी आयसीसीने (ICC) सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे आणि सामने फक्त 18 व 20 ऑक्टोबर असे दोन दिवस खेळले जाणार असून प्रत्येक दिवशी चार सामने होतील. दुबई आणि अबू धाबी येथे एकूण 8 सामने खेळले जातील. विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियापुढे (Team India) सराव सामन्यांमध्ये इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघाचे आव्हान असेल. दुसरीकडे, सुपर 12 फेरीत आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांना स्पर्धा देण्यापूर्वी पाकिस्तानला (Pakistan) गतविजेता वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मैदानात उतरेल. (ICC T20 World Cup 2021 वर्ल्ड कपपूर्वी BCCI चे टेंशन वाढले, टीम इंडियाचा धाकड खेळाडू गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त; जखमी असूनही IPL मधून नाही घेतली माघार)

भारत जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असेल, विशेषत: विराट कोहली स्पर्धेनंतर आपले कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत असल्यामुळे भारतीय संघ आपले दुसरे विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असेल. दरम्यान, आत्तापर्यंत हे निश्चित झाले आहे की स्टार स्पोर्ट्स 17 ऑक्टोबरपासून मुख्य स्पर्धेव्यतिरिक्त भारताच्या सराव सामन्यांचे प्रसारण करेल. सुपर 12 फेरीची सुरुवात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने होईल, तर 2016 टी-20 विश्वचषक फायनलिस्ट इंग्लंड आणि वेस्ट इंडिज देखील त्याच दिवशी आमनेसामने येतील. सराव सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

18 ऑक्टोबर, सोमवार - शेख जायद स्टेडियम, अबू धाबी

सामना 1 - अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका - दुपारी 3:30 वाजता

सामना 2 -न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया -7: 30 PM वाजता

18 ऑक्टोबर, सोमवार - दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

सामना 3 - पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज - दुपारी 3:30 वाजता

सामना 4 - भारत विरुद्ध इंग्लंड - संध्याकाळी 7:30 वाजता

20 ऑक्टोबर, बुधवार - शेख जायद स्टेडियम, अबू धाबी

सामना 5 - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड - दुपारी 3:30 वाजता

सामना 6 - दक्षिण आफ्रिका वि पाकिस्तान - संध्याकाळी 7:30 वाजता

20 ऑक्टोबर, बुधवार - दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

सामना 7 - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - दुपारी 3:30 वाजता

सामना 8 - अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज - संध्याकाळी 7:30 वाजता