India vs West Indies 2nd Test: मुंबईकर शार्दुल ठाकूरचा संघात समावेश

त्यांचा संघ हा नवखा असून भारताला मालिकेत निर्विवाद विजयाची नामी संधी आहे.

Shardul Thakur | File Photo | (Photo Credits- Twitter @imShard)

मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा समावेश वेस्टइंडीज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत करण्यात आला आहे. पहिल्या सामन्यात शार्दुलला संघात स्थान दिले गेले नव्हते. त्याच्या जागी उमेश यादव आणि मोहम्मद शमीला संघात घेण्यात आलं होतं. परंतु या दोघांना ही म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती. म्हणून आता संघ व्यवस्थापकाने मुंबईकर शार्दुलला संधी देण्याचं ठरवलं आहे. ठाकूरने मुंबई संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याला याआधी एकदिवसीय संघात सुद्धा स्थान दिले आहे.  भारतीय क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्वीटर पेजवरून अंतिम १२ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. नक्की वाचा:  India vs West Indies 2nd Test: भारताला मालिका विजयाची सुवर्ण संधी.

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ:

पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्टइंडीज संघाचा एक डाव आणि २७२ रुन्सने धुव्वा उडवला होता. त्यांचा संघ हा नवखा असून भारताला मालिकेत निर्विवाद विजयाची नामी संधी आहे. कसोटी मालिकेनंतर भारत आणि वेस्टइंडीज एकदिवसीय आणि T20 मालिका सुद्धा खेळणार आहेत.



संबंधित बातम्या