RR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)

या दरम्यान, संजू सॅमसनने मारलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या पार जाताना निकोलस पूरनने 'सुपरमॅन डाइव्ह' मारली आणि षटकार अडवला. पूरने अडकलेला षटकार क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम असल्याची टिप्पणी नेटकऱ्यांनी दिली.

निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह' (Photo Credit: Twitter/lionsdenkxip)

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा (IPL) 9वा सामना खेळला जात आहे. टॉस गमावून पहिले फलंदाजी करून पंजाबने राजस्थानसमोर 224 धावांचे आव्हान उभे केले. प्रयुत्तरात राजस्थान रॉयल्सला जोस बटलरच्या रूपात पहिला धक्का बसला, पण नंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि सानू सॅमसनच्या जोडीने डाव सांभाळला. या दरम्यान, संजू सॅमसनने (Sanju Samson) मारलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या पार जाताना निकोलस पूरनने (Nicholas Pooran) 'सुपरमॅन डाइव्ह' मारली आणि षटकार अडवला. पूरने अडकलेला षटकार क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम असल्याची टिप्पणी नेटकऱ्यांनी दिली. राजस्थान आणि पंजाब आयपीएलमधील दोन तगडे संघ आहेत आणि दोन्ही टीममधील सामना रंगतदार होईल हे नक्की. (RR vs KXIP, IPL 2020: केएल राहुल-मयंक अग्रवालचा RRवर हल्लाबोल, पॉवर-प्लेमध्ये केल्या पंजाबने केल्या सर्वाधिक धावा; नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव)

दरम्यान, मुरुगन अश्विनच्या ओव्हरमधील एका चेंडूवर सॅमसनने षटकार मारण्याच्या हेतूने मोठा शॉट लगावला, पण पूरनने सीमारेषेच्या अगदी जवळ सुंदर उडी मारली आणि टीमसाठी 4 धावा अडवल्या. तो सीमारेषा पार करीत आहे हे जाणून ग्राऊंडवर पडण्यापूर्वी त्याने चेंडू परत ग्लेन मॅक्सवेलकडे उडवला आणि सॅमसनला त्या चेंडूवर दोन धावा मिळाल्या. पूरनचे समर्पण पाहून नेटकरी देखील इम्प्रेस झाले आणि वेस्ट इंडिजच्या विकेटकिपर-फलंदाजावर कौतुकाचा वर्षाव केला. पाहा पूरनची 'ती' अफलातून डाइव्ह:

किंग्ज इलेव्हन पंजाबने रविवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या सत्रातील आपल्या तिसऱ्या सामन्यात पहिले फलंदाजी केली आणि दोन विकेट गमावून 223 धावा केल्या. मयंक अग्रवालने संघासाठी 50 चेंडूत 106 धावा फटकावल्या, ज्यामध्ये त्याने 10 चौकार आणि सात षटकार ठोकले.त्याच्याशिवाय कर्णधार लोकेश राहुलने 54 चेंडूत सात चौकार आणि एका षटकारासह 69 धावांचे योगदान दिले. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 183 धावांची भागीदारी केली. निकोलस पूरनने नाबाद 25 आणि ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 13 धावा केल्या. राजस्थानकडून अंकित राजपूत आणि टॉम कुरन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.