India vs West Indies 2018: एकदिवसीय मालिकेसाठी विराट कोहलीकडून रोहित शर्माकडे येऊ शकते भारतीय संघाचं नेतृत्त्व
रोहितने आपल्या फलंदाजीतून सुद्धा उल्लेखनीय कामगिरी केली होती.
भारत आणि वेस्टइंडीज मध्ये २ कसोटी सामने झाल्यानंतर एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. ५ सामन्याच्या मालिकेत पहिला सामना हा २१ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. ह्या मालिकेसाठी पुन्हा एकदा रोहित शर्माच्या खांद्यावर संघाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते. कोहली हा एशिया कपमध्ये सुद्धा खेळला नव्हता.
नक्की वाचा: India vs West Indies 2nd Test: भारताला मालिका विजयाची सुवर्ण संधी.
बीसीसीआईच्या बड्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहली सोबत इतर महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. तसे झालेच तर मुंबईचा फलंदाज रोहित शर्माला संघाचा कर्णधार होण्याची संधी मिळेल.
एशिया कपमध्ये चांगली कामगिरी
भारताने नुकत्याच झालेल्या एशिया कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात चांगली कामगिरी करत जेतेपद पटकावलं होतं. रोहितने आपल्या फलंदाजीतून सुद्धा उल्लेखनीय कामगिरी केली होती. वेस्टइंडीज विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेसाठी त्याला वगळण्यात आलं आहे. ह्या निर्णया विरुद्ध अनेक माजी खेळाडूंनी टीका केली होती.