भारतीय क्रिकेटपटूंच्या ऑस्ट्रेलियातील विजयी कामगिरीवर लता मंगेशकर यांच्या सुरेल शुभेच्छा, MS Dhoni चं केलं खास कौतुक
माजी किकेटपटूंसोबतच भारतीय संघाला आज भारताची गानकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत.
India Vs Australia ODI Series: ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कामगिरी करणार्या भारतीय क्रिकेटपटूंवर आज जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुरूवातीला ऑस्ट्रेलिया विरूद्ध मायदेशात कसोटी सामना जिंकल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला होता आणि आज भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकत नवा विक्रम रचला आहे. 2-1 अशी आघाडी घेत भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामना जिंकला आहे. माजी किकेटपटूंसोबतच भारतीय संघाला आज भारताची गानकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत. India Vs Australia 3rd ODI: 7 विकेट्स राखत भारताचा ऐतिहासिक मालिका विजय
लता मंगेशकरांचे खास ट्विट
लता मंगेशकर यांनी आज ट्विट करताना भारतीय संघाचं कौतुक केले आहे पण त्यासोबतच विशेष कौतुक महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याचे असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यामध्ये विजयी कामगिरी करणार्या भारतीय संघाला शुभेच्छा देताना त्यांनी 'वंदे मातरम' (Vande Mataram) गाण्याचा खास व्हिडिओदेखील शेअर केला आहे. India Vs Australia 3rd ODI: ऑस्ट्रेलियातील भारताच्या ऐतिहासिक विजयावर खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव, पहा वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग यांचे ट्विट!
महेंद्र सिंग धोनीची एकदिवसीय सामना मालिकेतील कामगिरी उल्लेखनीय होती. धोनीने तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. तर अॅडलेड आणि आजच्या मेलबर्न सामन्यांमध्ये धोनी नाबाद खेळला. एकीकडे अपेक्षित परफॉर्मन्स देत नसल्याने धोनीवर काहींकडून टीका होत होती, मात्र संयमी धोनीने त्याला आपल्या खेळातूनच उत्तर दिलं आहे. महेंद्र सिंह धोनी 'मॅन ऑफ द सीरीज' आणि युजवेंद्र चहल 'मॅन ऑफ द मॅच' ठरला आहे.