Ind Vs Eng Test Series 2021: भारतीय संघाच्या अडचणीत वाढ, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्याआधीच 'या' खेळाडूला दुखापत
भारताला इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका (Ind Vs Eng Test Series 2021) खेळायची आहे.
न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम (World Test Championship Final) सामन्यात पराभव स्वीकारावा लागलेल्या भारतीय संघाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भारताला इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका (Ind Vs Eng Test Series 2021) खेळायची आहे. मात्र, यापूर्वीच भारतीय संघाचा आणखी एक धक्का बसला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान इशांत शर्माला (Ishant Sharma) दुखापत झाली आहे, ज्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच त्याच्या हातावर अनेक टाके पडले आहेत. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी तो तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, "इशांतला त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या व चौथ्या बोटावर अनेक टाके पडले आहेत. मात्र, इशांतची दुखापत फारशी गंभीर नाही. पुढील टाके पुढे उघडले जातील." दहा दिवसांत इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेसाठी सहा आठवडे शिल्लक असताना तो इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी फिट असेल. हे देखील वाचा-Mithali Raj हिची ऐतिहासिक कामगिरी, Sachin Tendulkar यांच्यानंतर असा कारनामा करणारी ठरली दुसरी खेळाडू
ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांपूर्वी ईशांत शर्माला मोठा धक्का बसला आहे, कारण तो सराव करू शकणार नाही. तसेच त्याला इतर व्यायाम करणे देखील टाळावे लागणार आहे. त्याची दुखापत लवकरच बरी होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. परंतु, या दुखापतीमुळे तो आगामी कसोटी मालिकेत खेळू शकणार की नाही? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
100 हून अधिक कसोटी सामने खेळणारा इशांत शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात त्याने 2 खेळाडूंना बाद केले. परंतु, दुसऱ्या डावात त्याला एकही विकेट मिळवता आला नाही. ज्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावा लागले. यामुळे इग्लंडविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी बजावतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.