Fact Check: वनीता पांडे यांच्या ‘Pallo Latke’ गाण्यात रोहित शर्मा आहे का? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्यता
भारताचा वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्याची शेवटची खेळी 2025 च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून झाली होती. त्यानंतर मे 2025 रोजी रोहितने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यापूर्वी, 2024च्या टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याने टी-20 क्रिकेटलाही अलविदा केला होता. क्रिकेटपासून काही काळ विश्रांती घेत रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. सध्या तो इटलीतील मिलान शहरात फिरताना चाहत्यांनी पाहिला. सोशल मीडियावर रोहितनेही आपल्या व्हेकेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले.
सोशल मीडियावर चुकीचा दावा
दरम्यान, सोशल मीडियावर एक 'Pallo Latke' या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीला रोहित शर्मा समजून चाहत्यांनी त्याची तुलना केली. असा दावा करण्यात आला की रोहित शर्मा या गाण्यात झळकला आहे. (हे देखील वाचा: Rohit Sharma ICC Trophies And Records As Captain: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकल्या इतक्या आयसीसी ट्रॉफी, कर्णधार म्हणून असा आहे विक्रमशील रेकॉर्ड)
'Pallo Latke' गाण्याचा व्हिडीओ आणि सत्यता
या दाव्याचे फॅक्ट चेक केल्यावर हे स्पष्ट झाले की, रोहित शर्मा त्या व्हिडीओमध्ये नाही. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती म्हणजे निझामी ब्रदर्स पैकी एक सदस्य आहे. ‘Pallo Latke’ हे गाणं 1 जून 2025 रोजी वनीता पांडे यांनी रिलीज केलं असून त्यात प्रसिद्ध कव्वाल निझामी बंधू देखील झळकले आहेत. निझामी बंधू ही 700 वर्षांची सांगीतिक परंपरा असलेली सूफी गायन मंडळी आहे. त्यांनी यापूर्वीही ‘कुन फाया कुन’ या प्रसिद्ध गाण्यात काम केलं आहे.
रोहित पुन्हा मैदानात केव्हा दिसणार?
सध्या विश्रांती घेत असलेला रोहित शर्मा ऑगस्ट २०२५ मध्ये बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर शुभमन गिल कडे भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.