IPL 2022: दिग्गज खेळाडूचे मोठे विधान, Arjun Tendulkar ला सलग दोन वर्ष संधी न देण्यासाठी मुंबई इंडियन्सचा असा केला बचाव

या सामन्यात यंदाही अर्जुन तेंडुलकरला मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून अर्जुन मुंबई संघाचा भाग आहे. आयपीएल 2021 मध्ये 20 लाख आणि 2022 मध्ये 30 लाखांत मुंबईने त्याचा संघात समावेश केला.

अर्जुन तेंडुलकर (Photo Credits: Instagram/Arjun Tendulkar)

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2022 हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) शनिवारी शेवटचा लीग सामना खेळायला मैदानात उतरली आहे. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) पदार्पणाची संधी मिळणे अपेक्षित होते मात्र, तसे झाले नाही. याशिवाय माजी भारतीय खेळाडू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) यांना अर्जुनच्या पदार्पणाची अपेक्षा नव्हती. मुंबईचा त्यांच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी (Delhi Capitals) वानखडे स्टेडियमवर सुरु आहे, ज्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकणे गरजेचे आहे. यावर कदाचित फ्रँचायझीला अद्याप अर्जुन मोठ्या प्रमाणावर तयार असण्याचा विश्वास नसावा असे मत कैफने व्यक्त केले. (IPL 2022, MI vs DC: रोहित शर्माचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, मुंबई इंडियन्समध्ये दोन बदल; दिल्लीच्या ताफ्यात Prithvi Shaw चे पुनरागमन)

स्पोर्ट्सकीडा वर मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्याचे पूर्वावलोकन करताना, कैफने अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाच्या शक्यतांबद्दल म्हटले, "जर MI ला असे वाटले असते की अर्जुन तेंडुलकर तयार आहे, तर त्यांनी त्याला आत्तापर्यंत खेळायला दिले असते. माझ्या मते त्यांना वाटते की अर्जुनला अजूनही त्याच्या खेळावर काम करण्याची गरज आहे. एखाद्या खेळाडूला आजमावण्यासाठी कर्णधार शेवटच्या सामन्यापर्यंत का थांबतो? तो पुरेसा चांगला असता तर त्याला आधीच संधी मिळाली असती. मला वाटत नाही की रोहित शर्मा हा असा कर्णधार आहे जो फक्त शेवटचा सामना आहे म्हणून खेळाडूला आजमावेल. एमआयला त्यांच्या सर्वोत्तम संयोजनासह हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे.”

तत्पूर्वी रोहित म्हणाला की, संघ सरासरी हंगाम संपण्यापूर्वी जास्तीत जास्त खेळाडूंना आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई इंडियन्सच्या 10व्या पराभवानंतर रोहित म्हणाला, “आम्ही शेवटच्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. जर आणखी काही खेळाडूंना आजमावण्याची संधी मिळाली तर आम्हीही तसाच प्रयत्न करू.” मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्टब्सच्या जागी डेवाल्ड ब्रेविस, तर जखमी संजय यादवच्या जागी हृतिक शोकीनचा समावेश केला आहे. यंदाही अर्जुन तेंडुलकरला मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून अर्जुन मुंबई संघाचा भाग आहे.



संबंधित बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद

NZ Beat ENG 3rd Test 2024 Scorecard: तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 423 धावांनी केला पराभव, मिशेल सँटनर ठरला विजयाचा हिरो; टीम साऊदीला मिळाल शानदार निरोप