IPL 2021 Mid-Season Transfer: काय आहे आयपीएल मिड-सीजन ट्रांसफर, जाणून घ्या कशी होणार खेळाडूंची अदला-बदली

इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या मोसमाची दणक्यात सुरुवात झाली आहे. काही फ्रँचायझींना निश्चितपणे योग्य संयोजन सापडले आहेत आणि हंगामात आत्मविश्वासाने आघाडी घेतली आहेत, तर असेही बरेच संघ आहेत जे अद्याप त्यांच्या उत्कृष्ट इलेव्हनच्या शोधात आहेत. अशा संघांना अधिक बळकट करण्यासाठी पाहणाऱ्यांसाठी मध्य हंगामात ट्रान्सफर विंडोमधून खेळाडूंची अदला-बदली करण्याची संधी मिळणार आहे.

IPL Trophy  (Photo Credit: Twitter)

IPL 2021 Mid-Season Transfer: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या मोसमाची दणक्यात सुरुवात झाली आहे. काही फ्रँचायझींना निश्चितपणे योग्य संयोजन सापडले आहेत आणि हंगामात आत्मविश्वासाने आघाडी घेतली आहेत, तर असेही बरेच संघ आहेत जे अद्याप त्यांच्या उत्कृष्ट इलेव्हनच्या शोधात आहेत. अशा संघांना अधिक बळकट करण्यासाठी पाहणाऱ्यांसाठी मध्य हंगामात ट्रान्सफर विंडोमधून (Mid-Season Transfer Window) खेळाडूंची अदला-बदली करण्याची संधी मिळणार आहे. आयपीएलच्या 14 व्या मोसमातील निम्मा हंगाम म्हणजेच प्रत्येक संघाचे प्रत्येकी 7 सामने पूर्ण झाल्यावर मिड-सीजन ट्रांसफर सुरु होईल. आयपीएलच्या (IPL) नवीन नियमांनुसार, सात सामने पूर्ण झाल्यानंतर फ्रँचायझी यंदाच्या हंगामासाठी परस्पर संमतीने इतर संघांसोबत (मिड-हंगामातील हस्तांतरण) खेळाडूंची अदला-बदली करू शकतात. (IPL: आयपीएलच्या एका ओव्हरमध्ये ‘या’ 5 दिग्गजांनी चोपल्या सर्वाधिक धावा, मैदानात उडवली गोलंदाजांची दाणादाण)

मिड-सीजन ट्रांसफरच्या नियमानुसार आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळलेल्या खेळाडूचे दुसऱ्या संघात मिड-सीजन ट्रांसफर केले जाऊ शकते.

यामध्ये कॅप्ड (भारतीय किंवा परदेशी) आणि अनकॅप्ड खेळाडू या मिड-सीजन ट्रांसफरमध्ये भाग घेऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे हा नियम 2019 मध्ये लागू करण्यात आला परंतु मागील मोसमात कोणत्याही संघाने त्याचा वापर केला नाही. यापूर्वी फक्त कॅप्ड खेळाडूंची अदला-बदल करण्याचा नियम होता. शिवाय, नियमांनुसार बदली झाल्यानंतरही खेळाडू जुन्या संघाचाच भाग असेल आणि पुढच्या हंगामात त्यांच्यासोबत पुन्हा राहील. इतकंच नाही तर बदली खेळाडूंना त्यांच्या मुख्य संघाविरुद्ध खेळता येणार नाही. लक्षात घेण्यासारखे म्हणजे खेळाडूंना दिली जाणारी रक्कम पर्स बॅलन्समधून मोजली जाणार नाही.

दरम्यान, आयपीएलच्या 2021 मोसमात असे अनेक धाकड खेळाडू आहे ज्यांना अद्याप आपला जलवा दाखवण्याची संधी मिळाली नाही आहे. या यादीमध्ये काही मोठी नावांचा देखील समावेश आहेत ज्यांना अद्याप आपला खेळ दाखवण्याची अधिक संधी मिळाली नाही. शिवाय, यंदाच्या मोसमात ते अधिकतर बेंचवरच बसून राहू शकतात. दरम्यान, मिड-सीजन ट्रांसफरसाठी पात्र असलेले खेळाडू जखमी झालेल्या खेळाडूंची जागा घेऊ शकतात की नाही याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. बर्‍याच प्रकरणांमध्ये फ्रेंचायझी स्वतः दुखापत झालेल्या खेळाडूच्या बदली दुसऱ्या क्रिकेटरची घोषणा करतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now