लॉकडाऊनमुळे गावात अडकलेले अंपायर अनिल चौधरी यांनी सांगितली कहाणी, मोबाईल रेंजसाठी झाडावर चढण्यास भाग पाडले

लॉकडाउन काळात ग्रामीण भागात राहताना किती अडचणींचा सामना करावा लागतोय याबद्दल चौधरी यांनी पीटीआयला माहिती दिली.

अंपायर अनिल चौधरी (Photo Credits: Getty Images)

21 दिवस चाललेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) आयसीसी (ICC) एलिट पॅनेल अंपायर अनिल चौधरी (Anil Chaudhary) उत्तर प्रदेशच्या शामली (Shamli) जिल्ह्यातील डांगरोल गावात अडकले आहेत. लॉकडाउन काळात ग्रामीण भागात राहताना किती अडचणींचा सामना करावा लागतोय याबद्दल चौधरी यांनी पीटीआयला माहिती दिली. 20 एकदिवसीय आणि 27 टी-20 सामन्यांमध्ये कामगिरी करणारे चौधरी हे भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेमध्ये अम्पीरिन्ग करणार होते, मात्र कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली. मालिका रद्द झाल्यावर चौधरी 16 मार्च रोजी आपल्या दोन मुलांसह आपल्या गावी गेले. परत येण्यापूर्वी तेथे एक आठवडा रहाण्याची त्याची योजना होती. तथापि,23 मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्याने अचानक त्यांच्या सर्व योजनांमध्ये अडथळा आणला आणि संवादासाठी योग्य मोबाइल नेटवर्क नसल्यामुळे लोकं ज्या गावात संघर्ष आहेत अशा गावात ते अडकले. (लॉकडाउनमध्ये रस्त्यावर गाडी घेऊन जाणे क्रिकेटर ऋषी धवनला पडले महागात, पोलिसांनी जागीच ठोठावला दंड)

“इथली सर्वात मोठी समस्या नेटवर्क आहे. मी कोणाशीही बोलू शकत नाही किंवा इंटरनेट वापरू शकत नाही. हे करण्यासाठी मला गावाबाहेर जाऊन झाडावर चढून किंवा छतावर जावे लागेल. मग नेटवर्कही सर्वकाळ उपलब्ध असते असे नाही," ते म्हणाले. अंपायरने स्वतःचे काही फोटोही सोशल मीडियावर झाडाच्या वरच्या बाजूला असताना फोन कॉल करण्याचा प्रयत्न करताना शेअर केली. अंपायरसाठी आयसीसीच्या ऑनलाइन कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्याला इंटरनेटची आवश्यकता असल्याचे चौधरी म्हणाले. गावात इंटरनेटची समस्या असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होत असल्याची खंतही चौधरी यांनी बोलून दाखवली. "माझा एक मुलगा हिंदू महाविद्यालयात शिकतो, त्याचे क्लासेस चालू आहेत पण तो त्यांत भाग घेऊ शकत नाही."

मोबाइल नेटवर्क समस्या ही नवीन समस्या नाही असे चौधरी म्हणतात. दिल्लीपासून 100 कि.मी. अंतरावर असूनही हे गाव गेल्या एक वर्षापासून या समस्येवर झगडत आहे. चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामप्रमुखांनी जिल्हा प्रभारी यांना यासंदर्भात तक्रार करण्यासाठी पत्र लिहिले आहे. दरम्यान, चौधरी यांनी आजूबाजूच्या लोकांना शिक्षित करण्याची संधी साधली आहे आणि सोशल डिस्टंसिंगची संकल्पना स्पष्ट केली आहे आणि रोगाबद्दल जागरूकता पसरविली आहे.