India Vs Australia 3rd Test : भारतीय संघ मजबूत स्थितीत; 443 धावांची आघाडी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने डाव घोषित केला.
India Vs Australia 3rd Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने डाव घोषित केला. पहिल्या डावात भारताने 7 विकेट गमावत 443 धावा केल्या आहेत. त्यानंतर सुरु झालेल्या तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने 6 ओव्हर्समध्ये एकही विकेट न गमावता 8 रन्स केले आहेत.
दुसऱ्या सत्रात चेतेश्वर पुजाराने (106) धुवादार शतक झळकावले. तर कोहलीने 82 धावांची जबरदस्त खेळी केली. रोहीत शर्मा 63 धावा करत नाबाद राहिला आहे. तर अजिंक्य राहणे 34 धावा तर रिषभ पंत 39 धावांत तंबूत परतले. रविंद्र जडेलाला ऑस्ट्रेलिया संघाने 4 धावात माघारी पाठवले.
पहिल्या दिवशीअखेर भारताने 215 धावा केल्या असून भारताला 2 विकेट्स गमवाव्या लागल्या होत्या. पहिल्या दिवशी सलामीवीर मयांक अग्रवालने 76 धावा करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर चेतेश्वर पुजारा 68 धावांवर तर कर्णधार विराट कोहलीही 47 धावांवर नाबाद राहीले होते.
चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील दोन सामने झाले असून दोघी संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत.