जसप्रीत बुमराहने घेतल्या पाच विकेट्स
प्रत्युत्तरात, पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडचा संघाने 10 विकेट गमावून 465 धावा केल्या. आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात काही खास झाली नाही. झॅक क्रॉली 4 धावा करुन बुमराहाचा बळी ठरला. पुढे पोप आणि डकेटने 122 धावांची भागीदारी रचली. इंगलंडकडून ऑली पोपने 106 धावा केल्या तर हॅरी ब्रूक 99 बाद झाला. जेमी स्मिथ 40 आणि ख्रिस वोक्स 38 धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने तीन आणि मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या.
ऋषभ पंत आणि केएल राहुलचे शानदार शतक
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही. जयस्वाल 4, सुदर्शन 30 आणि गिल 8 धावांवर माघारी परतले. त्यानंतर केएल राहुल आणि ऋषभ पंतने डाव सांभाळत 192 धावांची शानदार भागीदारी रचली. केएल राहुल 137 आणि ऋषभ पंतने 118 धावा केल्या आणि भारताचा स्कोर 364 धावांवर पर्यंत पोहचवला. भारताने पहिल्या डावात 6 धावांची आघाडी घेतल्याने इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लडकडून ब्रायडन कार्से आणि जोश टंगनेने प्रत्येतकी 3 विकेट घेतल्या.
बेन डकेटची 149 धावांची विजय खेळी
त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी 188 धावांची मोठी भागीदारी रचली. क्रॅाली 65 आणि बेन डकेट 149 धावा केल्या. नंतर जो रूट 53 आणि जेमी स्मिथच्या 44 नाबाद खेळीने इंग्लंडला मोठा विजय मिळवून दिला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी 2-2 विकेट घेतल्या, तर रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. या डावात बुमराह आणि सिराज यांना यश मिळाले नाही. इंग्लंडने केवळ 82 षटकांत लक्ष्य गाठले आणि कसोटी इतिहासातील आणखी एक संस्मरणीय विजय नोंदवला. या पराभवासह भारत पाच सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने मागे पडला. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 ते 6 जुलैपासुन एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे दुपारी 3.30 वाजल्यापासून खेळवला जाईल.