IND vs NZ 2nd Test 2024 Day 2 Live Streaming: जैस्वाल-गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा, भारत न्यूझीलंडच्या 243 धावांनी मागे; थोड्याच वेळात दुसऱ्या दिवसाच्या खेळाला होणार सुरुवात

IND vs NZ: पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा आठ गडी खून पराभव केला होता. यासह न्यूझीलंडने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. आज खेळाच दुसरा दिवस आहे.

Shubman Gill And Yashasvi Jaiswal (Photo Credit - X)

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team  Pune Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune)  खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा आठ गडी खून पराभव केला होता. यासह न्यूझीलंडने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. आज खेळाच दुसरा दिवस आहे. त्याआधी, पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने रोहित शर्माची विकेट गमावून 16/1 धावा केल्या आहे. सध्या शुभमन गिल 10 आणि यशस्वी जैसवाल 6 धावांवर खेळत आहे.

वॉशिंग्टन सुंदरने घेतल्या सात विकेट

तत्तपुर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 259 केल्या. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी चांगली कामगिरी केली. कॉनवेने 141 चेंडूंचा सामना करत 76 धावा केल्या. रवींद्रने 65 धावांचे योगदान दिले. मिचेल सँटनर 33 धावा करून बाद झाला. टॉम लॅथम 15 धावा करून बाहेर पडला. भारताकडून सुंदरने 7 आणि अश्विनने 3 विकेट घेतल्या. (हे देखील वाचा: BAN vs SA 1st Test 2024 Day 4 Scorecard: दक्षिण आफ्रिकेने 10 वर्षांनंतर आशियामध्ये मिळवला विजय, बांगलादेशचा 7 विकेट्सने केला पराभव; मालिकेत घेतली 1-0 अशी आघाडी)

कधी अन् कुठे पाहणार सामना?

दुसऱ्या दिवसाच्या खेळला भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरुवात होईल. तसेच दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 आणि कलर्स सिनेप्लेक्स चॅनेलवर उपलब्ध असेल. तर लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर उपलब्ध असेल. याशिवाय, लेटेस्टलीच्या वेबसाइटवर तुम्हाला प्रत्येक लाइव्ह अपडेट मिळेल.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल, विल्यम ओरोरके

Share Now

Tags

New Zealand New Zealand National Cricket Team India National Cricket Team Maharashtra Cricket Association Stadium Pune IND vs NZ 2nd Test India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test Rohit Sharma Team India Team India vs New Zealand Test Serie न्यूझीलंड न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ बंगळुरू भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी कसोटी भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ पुणे पुणे कसोटी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम रोहित शर्मा टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका ind वि NZ भारत वि न्यूझीलंड भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ वि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ India national cricket team vs New Zealand national cricket team match scorecard IND vs NZ 2nd Test 2024 IND vs NZ 1st Test Live Score Update IND vs NZ 1st Test Day 5 Live Score Update new zealand national cricket team vs india national cricket team match scorecard IND vs NZ 2nd Test Day 2 Live Streaming
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement