ICC Cricket World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला पुन्हा 'चॅम्पियन' बनवण्यात या 5 क्रिकेटर्सचा खेळ बजावणार महत्त्वाची भूमिका
सारेच संघ आपलं 100% देऊन या स्पर्धेमध्ये उतरतात. पहा भारतीय संघाला कोणाकोणा कडून आहेत अपेक्षा
ICC Cricket World Cup 2019: क्रिकेट विश्वातली मानाचा समजला जाणारा 'विश्वचषक'(World Cup) जिंकणं हे प्रत्येक संघांचं उद्दिष्ट असतं. 2019 च्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघ तयारी करत आहे. सातत्याने भारतीय संघ बदल करताना दिसत आहे. 2019 च्या संघामध्ये युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. मागील वर्ल्डकप सचिन तेंडुलकरसाठी जिंकायचाच असा भारतीय संघाचा निश्चय होता. यंदादेखील उत्तम फॉर्ममध्ये असल्याने, चांगल्या खेळाडूंची साथ असल्याने पुर्ण तयारीनिशी मैदानामध्ये उतरणार आहे. Indian Cricket Team 2019 Schedule: नव्या वर्षात कसं असेल भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक?
कोणकोणत्या भारतीय खेळाडूंचा सर्वोत्तम खेळ भारतासाठी ठरणार फायदेशीर ?
रोहित शर्मा -
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माकडून भारतला अपेक्षा आहेत. टेस्ट सीरीजमधील सध्याचा त्याचा खेळ पाहता वर्ल्डकपमध्येही तो कमाल दाखवेल अशी अपेक्षा आहे. अनेकदा भारतीय संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी तो मदत करतो. त्यामुळे वर्ल्डकप 2019 च्या महत्त्वाच्या सामन्यातही तो आपला तारणहार होणार आहे. Rohit Sharma च्या मुलीची पहिली झलक (Photo)
विराट कोहली -
विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघ पहिल्यांदा वर्ल्डकप खेळणार आहे. रनमशीन अशी ओळख असणार्या विराट कोहलीला वर्ल्डकपसाठी तयार होणं गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर खास कामगिरी केली नसली तरीही तो उत्तम खेळतो. जेव्हा भारताला धावांची संख्या असते तेव्हा विराट हमखास 100% देऊन खेळतो.
एम एस धोनी -
भारताचा कूल कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाखाली आपण मागील वर्ल्डकप हरलो होतो आता धोनीकडे कर्णधारपदाची जबाबदारी नसल्याने काही प्रमाणात दबाव कमी असेल. या वर्ल्डकपनंतर धोनी निवृत्ती घेणार असल्याने धोनीसोबतच त्याच्या चाहत्यांसाठी 2019चा वर्ल्डकप खास असेल.
जसप्रीत बुमराह -
सध्याच्या घडीला केवळ भारतीय संघातील म्हणून नव्हे तर अवघ्या क्रिकेट जगतामध्ये जसप्रीत बुमराह उत्तम गोलंदाज आहे. त्यामुळे आगामी विश्वकप स्पर्धेमध्ये जसप्रीत बुमराह शिवाय भारतीय संघ मैदानामध्ये उतरण अशक्य आहे.
कुलदीप यादव
भारताचा स्पिनर कुलदीप यादव याच्याकडूनही भारताला अपेक्षा आहेत. क्रिकेतच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याचा उत्तम खेळ पहायला मिळाला आहे. मागील वर्षभरात त्याचि कामगिरी उताम आहे.
ICC Cricket World Cup 2019 मे महिन्यामध्ये इंग्लंडमध्ये रंगणार आहे. सारेच संघ आपलं 100% देऊन या स्पर्धेमध्ये उतरतात.