Kolkata Beat Hyderabad, IPL 2025 15th Match Scorecard: हैदराबादचा सर्वात मोठा पराभव, कोलकाता 80 धावांनी विजयी; अय्यर-रघुवंशीनंतर वैभव-चक्रवर्ती चमकले
कोलकाताने हैदराबादचा 80 धावांनी पराभव करत या हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. त्याआधी, हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने हैदराबादसमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबाद संघ 16.4 षटकात 120 धावांवर गारद झाला.
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 15 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात ईडन गार्डन्स, कोलकाता (Eden Gardens, Kolkata) येथे खेळवला गेला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा 80 धावांनी पराभव करत या हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. त्याआधी, हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने हैदराबादसमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबाद संघ 16.4 षटकात 120 धावांवर गारद झाला.
वेंकटेश अय्यरची 60 धावांची शानदार खेळी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने 20 षटकात 6 गडी गमावून 200 धावा केल्या. कोलकाताकडून वेंकटेश अय्यरने 60 धावांची शानदार खेळी केली. त्याने 29 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्याशिवाय अंगकृष रघुवंशीने 50 आणि रिंकू सिंगने 32 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद संघाकडून गोलंदाजीत मोहम्मद शमी, पॅट कमिन्स, झीशान अन्सारी, कामेंदु मेंडिस आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्तीची घातक गोलंदाजी
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादचा संघ 16.4 षटकांत 10 गडी गमावून 120 धावा करु शकला. हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने 33 धावांची सर्वाधिक खेळी केली. या खेळीदरम्यान, क्लासेनने 21 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, कोणत्याही फलंदाजाला जास्त धावा करता आल्या नाही. तर कोलकाताकडून वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्तीने 3-3 विकेट घेतल्या.