Happy Birthday Shardul Thakur: सहा बॉलमध्ये 6 षटकार ठोकणाऱ्या 'पालघर एक्सप्रेस' अर्थातच शार्दूल ठाकूर याच्यबद्दलचे काही हटके किस्से, जाणून घ्या
भारतीय संघाचा युवा मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूरचा जन्म महाराष्ट्रातील पालघर येथे झाला. पण, त्याने महाराष्ट्राऐवजी रणजी करंडक स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात 2012-13 च्या मोसमात पदार्पण केले.
भारतीय संघाचा युवा मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याचा आज वाढदिवस आहे. 28 वर्षीय शार्दूलचा जन्म महाराष्ट्रातील पालघर येथे झाला. 21 फेब्रुवारी 2018 रोजी शार्दुलने सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकाविरूद्ध टी-20 सामान्यासह भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने चार ओव्हरमध्ये 31 धावा देत संघासाठी मोठ्या विजयाची नोंद केली होती. ठाकूरने टीम इंडियासाठी आजवर सात टी -20 सामने खेळले आहेत. यावेळी त्याने सात डावांमध्ये आठ विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, शार्दुलने 31 ऑगस्ट 2017 रोजी कोलंबोमध्ये श्रीलंकाविरुद्ध संघासाठी पहिला वनडे सामना खेळला होता. पदार्पणाच्या सामन्यात ठाकूरने सात ओव्हर गोलंदाजी करताना 26 धावा देत १ विकेट मिळवली होती. भारतीय संघाने या सामन्याला 168 धावांनी नाव दिले होते.
दरम्यान, शार्दुलने स्वत: ला मुंबई संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून ओळख निर्माण केली आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या मागील दोन सत्रात मुंबई संघात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा तो एक होता. शार्दूलच्या आजच्या या खास दिवशी जाणून घेऊया या मुंबईकर बाबत काही मनोरंजक तथ्य:
1. शार्दूलचा जन्म महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात झाला. पण, त्याने महाराष्ट्राऐवजी रणजी करंडक स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात 2012-13 च्या मोसमात पदार्पण केले.
2. मुंबई सर्कलमध्ये त्याला पालघर एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते.
3. एकदा जादा वजन असल्यामुळे त्याला मुंबई अंडर-19 संघातून वगळण्यात आले होते.
4. शार्दूलची सुरुवात सोपी नव्हती. तो दररोज पालघरहून मुंबई दक्षिणेकडे रेल्वेने प्रवास करीत असे. क्रिकेट असा प्रवास हा साडेतीन तासांचा असायचा. त्याच्या दिवसाची सुरुवात पहाटे 3.30 वाजता व्हायची. सकाळी 7.30 वाजेपर्यंत ग्राउंडवर पोचण्यासाठी त्याला सकाळी 4 वाजताची ट्रेन पकडायला लागायची.
5. हॅरिस शिल्डमध्ये एका ओव्हरमध्ये सहा षटकार ठोकत शार्दूल नावलौकात आला. हॅरिस शिल्डमध्ये सहा षटकार ठोकण्याची ही पहिलीच घटना होती. गॅरी सोबर्स आणि रवी शास्त्री यांच्यानंतर हा पराक्रम गाठणारा तो तिसरा खेळाडू ठरला.
6. बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हनकडून खेळताना त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 4 गडी बाद केले. यात फफ डू प्लेसिस आणि हशिम अमला यांचे दोन मुख्य विकेट होते.
दरम्यान, शार्दुलला देशासाठी कसोटी सामन्यात फारशी संधी मिळू शकलेली नाही. हैदराबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने एकमेव टेस्ट सामना खेळला आहे. या सामन्यात ठाकूरला 1.4 षटकांच्या गोलंदाजीनंतर दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. शार्दूलच्या कारकीर्द चांगली सुरू झाली नव्हती आणि त्याने पहिल्या चार सामन्यात 82.0 च्या गोलंदाजीच्या सरासरीने फक्त चार विकेट्स घेतल्या, परंतु 2012-13 मध्ये रणजी ट्रॉफीत त्याने सहा कसोटी सामन्यात 26.25 च्या सरासरीने 27 विकेट घेतल्या. यातील एका डावात पाच विकेटचा देखील समावेश होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)