Chennai Beat Mumbai, IPL 2025 3rd T20 Match Scorecard: चेन्नईने केली विजयी सुरुवात, मुंबईने नेहमीप्रमाणे गमावला पहिला सामना
चेन्नईने मुंबईचा 4 गडी राखुन विजयाने सुरुवात केली आहे. त्याआधी, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने चेन्नईसमोर 156 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईने 19.1 षटकात लक्ष्य गाठले.
Chennai Super Kings vs Mumbai Indians, IPL 2025 3rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 सुरू झाली आहे. या हंगामातील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात चेन्नईने मुंबईचा (CSK Beat MUM) 4 गडी राखुन विजयाने सुरुवात केली आहे. त्याआधी, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने चेन्नईसमोर 156 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईने 19.1 षटकात लक्ष्य गाठले. (हे देखील वाचा: MI vs CSK: रोहित शर्मा 18 वेळा शून्यावर बाद; 'हिटमॅन'चा आयपीएलमधील सर्वात वाईट रेकॉर्ड)
नूर अहमदने घेतल्या सर्वाधिक चार विकेट्स
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकांत नऊ गडी गमावून 155 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने 31 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, तिलक वर्माने 25 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. तिलक वर्मा व्यतिरिक्त कर्णधार सूर्यकुमार यादवने 29 धावा केल्या. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जकडून स्टार गोलंदाज नूर अहमदने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. नूर अहमद व्यतिरिक्त खलील अहमदने तीन विकेट्स घेतल्या.
रचिन रवींद्रची 65 धावांची नाबाद खेळी
लक्ष्याचा पाठलगा करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने 19.1 षटकांत सहा विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर रचिन रवींद्रने सर्वाधिक 65 धावांची नाबाद खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, रचिन रवींद्रने 45 चेंडूत दोन चौकार आणि चार षटकार मारले. रचिन रवींद्र व्यतिरिक्त, ऋतुराज गायकवाडने 53 धावा केल्या. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सकडून विघ्नेश पुथूरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. विघ्नेश पुथूर व्यतिरिक्त दीपक चहर आणि विल जॅक्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.