ICC T20 World Cup 2024 All Squads: टी-20 विश्वचषक 2024 साठी सर्व 20 संघ जाहीर, एका क्लिकवर येथे पाहा संपूर्ण संघ आणि राखीव खेळाडू
क्रिकेटचा महाकुंभ टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) 1 जूनपासून सुरू होत आहे. आता सर्व 20 संघांनी आगामी टी-20 विश्वचषकासाठी आपले संघ जाहीर केले आहेत. आपला संघ जाहीर करणारा पाकिस्तान हा शेवटचा संघ आहे.
T20 World Cup 2024: क्रिकेटचा महाकुंभ टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) 1 जूनपासून सुरू होत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत 20 संघ सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संघांची प्रत्येकी पाचच्या चार गटात विभागणी करण्यात आली आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या आतापर्यंत 8 आवृत्त्या झाल्या आहेत. यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यजमान आहेत. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. 20 संघ असल्याने चाहत्यांचा जल्लोष आणि उत्साह द्विगुणित झाला आहे. आता सर्व 20 संघांनी आगामी टी-20 विश्वचषकासाठी आपले संघ जाहीर केले आहेत. आपला संघ जाहीर करणारा पाकिस्तान हा शेवटचा संघ आहे. (हे देखील वाचा: PVR Inox to Screen T20 Cricket: आता चित्रपटगृहांमध्ये पाहू शकाल टी-20 क्रिकेट विश्वचषक सामने; प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यासाठी 'पीव्हीआर आयनॉक्स'ची मोठी योजना)
पहिला टी-20 विश्वचषक 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळवला गेला
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे दोनच संघ आहेत ज्यांनी प्रत्येकी दोनदा टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे. तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी एकदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. पहिला टी-20 विश्वचषक 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळवला गेला होता. 2007 मध्ये भारताने पाकिस्तानला हरवून टी-20 विश्वचषक जिंकला होता.
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व 20 संघांचे खेळाडू
अफगाणिस्तान : राशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, अजमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारुकी , फरीद अहमद मलिक.
राखीव : सादिक अटल, हजरतुल्ला झाझई, सलीम साफी
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा.
राखीव : जेक फ्रेझर-मॅकगर्क, मॅट शॉर्ट
बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तस्किन अहमद, लिटन दास, सौम्या सरकार, तनजीद हसन तमीम, शाकिब अल हसन, तौहीद हृदोय, महमूद उल्लाह रियाद, जेकर अली अनिक, तन्वीर इस्लाम, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब.
राखीव : अफिफ हुसेन, हसन महमूद
कॅनडा : साद बिन जफर (कर्णधार), आरोन जॉन्सन, दिलन हेलिगर, दिलप्रीत बाजवा, हर्ष ठाकर, जेरेमी गॉर्डन, जुनैद सिद्दीकी, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किर्तन, परगट सिंग, रविंदरपाल सिंग, रेयांखान पठाण, श्रेयस मोव्वा
राखीव : तजिंदर सिंग, आदित्य वरदराजन, अममार खालिद, जतिंदर मथारू, परवीन कुमार
इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जोनाथन बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपले, मार्क वुड
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान
आयर्लंड : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्र्यू बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग.
नामिबिया : गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जॅन ग्रीन, मायकेल व्हॅन लिंजेन, डायलन लीचर, रुबेन ट्रम्पेलमन, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो, टांगेनी लुंगामेनी, निको डेव्हलिन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, जेपी कोट्झ, डेव्हिड विसे, बर्नार्ड शॉल्ट्ज, मालन क्रुगर, पीडी ब्लिग्नॉट
नेपाळ : रोहित पौडेल (कर्णधार), आसिफ शेख, अनिल कुमार शाह, कुशल भुर्तेल, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग ऐरे, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, संदीप जोरा, अविनाश बोहरा, सागर ढकल, कमल सिंग ऐरी
नेदरलँड्स : स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), आर्यन दत्त, बास डी लीडे, काइल क्लाइन, लोगन व्हॅन बीक, मॅक्स ओ'डॉड, मायकेल लेविट, पॉल व्हॅन मीकरेन, साकिब झुल्फिकार, सिब्रांड एंजेलब्रेक्ट, तेजा निदामनुरु, टिम प्रिंगल, विक्रम सिंग, विक्रम सिंग किंगमा, वेस्ली बॅरेसी
राखीव : रायन क्लेन
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी .
राखीव : बेन सीअर्स
ओमान : आकिब इलियास (कर्णधार), झीशान मकसूद, कश्यप प्रजापती, प्रतीक आठवले, अयान खान, शोएब खान, मोहम्मद नदीम, नसीम खुशी, मेहरान खान, बिलाल खान, रफीउल्लाह, कलीमुल्लाह, फैयाज बट्ट, शकील अहमद, खालिद कैल.
राखीव : जतिंदर सिंग, समय श्रीवास्तव, सुफियान महमूद, जय ओडेद्रा
पापुआ न्यू गिनी : असदुल्ला वाला (कर्णधार), एली नाओ, चाड सोपर, सीजे अमिनी, हिला वेरे, हिरी हिरी, जॅक गार्डनर, जॉन कारीको, काबुआ वागी मोरिया, किपलिंग डोरिगा, लेगा सियाका, नॉर्मन वानुआ, सेमा कामिया, सेसे बाऊ, टोनी उरा
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान
स्कॉटलंड : रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस, ब्रॅड करी, ख्रिस ग्रीव्हज, ऑली हेस, जॅक जार्विस, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुन्से, सफियान शरीफ, ख्रिस सॉले, चार्ली टीयर, मार्क वॉट, ब्रॅड व्हील.
दक्षिण आफ्रिका : एडन माक्ररम (कर्णधार), ओटानिल्स बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रायझम्सी, ट्रिबेस्टन स्टब
श्रीलंका : वानिंदू हसरंगा (कर्णधार), चारिथ असलंका, कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सादिरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजय डी सिल्वा, महिश थेक्षाना, दुनिथ वेलागे, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा, मथिशा पाथिराना, दिलशान मदुशंका.
राखीव : असिथा फर्नांडो, विजयकांत वायकांत, भानुका राजपक्षे, जेनिथ लियानागे.
युगांडा : ब्रायन मसाबा (कर्णधार), सायमन सेसाझी, रॉजर मुकासा, कॉस्मास क्यावुता, दिनेश नाक्रानी, फ्रेड अचेलम, केनेथ वायस्वा, अल्पेश रामजानी, फ्रँक नुसुबुगा, हेन्री सेसेन्डो, बिलाल हसुन, रॉबिन्सन ओबुया, रियाजत अली शाह, रियाजत अली शाह, रॉबिन्सन ओबुया
राखीव : निर्दोष मवेबेज, रोनाल्ड लुटाया
युनायटेड स्टेट्स अमेरिका : मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स, अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोष्टुश केंजिगे, सौरभ नेथ्रालवकर, शॅडली व्हॅन शाल्क्विक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर
राखीव : गजानंद सिंग, जुआनोय ड्रायस्डेल, यासिर मोहम्मद.
वेस्ट इंडिज : रोव्हमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेरफर्ड .
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)