India Beat Zimbabwe: यशस्वी-गिलची स्फोटक कामगिरी, भारताचा झिम्बाब्वेवर 10 गडी राखून विजय; मालिकाही घातली खिशात

दोन्ही संघांमधील हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झाला. चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे.

IND vs ZIM 4th T20I: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघ यांच्यात आज पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झाला. चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाने 20 षटकात 7 गडी गमावून 152 धावा केल्या. झिम्बाब्वेसाठी कर्णधार सिकंदर रझाने 48 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून खलील अहमदने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने एकही विकेट न गमावता अवघ्या 15.2 षटकांत हे लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी सलामीवीर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 93 नाबाद धावांची खेळी खेळली. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना उद्या हरारे येथे संध्याकाळी 4.30 वाजता खेळवला जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement