World Cup 2023: भारत चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत; न्यूझीलंडचा पराभव करून घेतला 2019 चा बदला; सोशल मिडियावर 'Badla Le Liya' मीम्स व्हायरल, पहा

या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून भारताने केवळ अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले नाही तर, 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला.

World Cup 2023

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 4 गडी गमावून 397 धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकात 327 धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून भारताने केवळ अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले नाही तर, 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. 2019 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत किवी संघाकडून पराभूत झाला होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्या पराभवाचा बदला घेतला आहे. भारताच्या विजयानंतर सोशल मिडियावर ‘badla le liya’ अर्थाचे मीम्स व्हायरल होत आहे. (हेही वाचा: India Beat New Zealand: गेल्या विश्वचषकाचा वचपा काढलाच, उपांत्य फेरीत न्युझीलंडला लोळवलं; भारताने अंतिम फेरीत मारली धडक)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement