IPL 2023 DC vs GT: आयपीएलच्या मॅचमध्ये हे काय आश्चर्य! चेंडू 140 च्या वेगाने स्टंपला लागला तरीही वॉर्नर राहिला नाबाद (Watch Video)

या सामन्यात गुजरात संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय बर्‍याच अंशी योग्य ठरला आणि दिल्लीने 10 षटकांत 4 विकेट गमावल्या.

आयपीएल 2023 ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. आज 7व्या सामन्यात गुजरातचा संघ दिल्ली कॅपिटल्सच्या संघासमोर आहे. या सामन्यात गुजरात संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय बर्‍याच अंशी योग्य ठरला आणि दिल्लीने 10 षटकांत 4 विकेट गमावल्या. पण दिल्लीच्या डावात मैदानात असं काही घडलं ज्यामुळे खळबळ उडाली. गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सुरुवातीपासूनच घातक गोलंदाजी करत होता. दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने शमीच्या अनेक चेंडूंवर बाद होण्याचे टाळले. यात एक प्रसंग असा आला की वॉर्नरला मारताना शमीचा एक चेंडू स्टंपला लागला, पण त्याचे नशीब इतके चांगले होते की विकेट पडली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now