SA vs ENG 11th Match Scorecard: इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेसमोर शरणागती पत्करली, विजयासाठी दिले 180 धावांचे लक्ष्य; यासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश
नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण इंग्लंड संघ 38.2 षटकांत फक्त 179 धावांवर आटोपला. यासह, दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
South Africa National Cricket Team vs England National Cricket Team: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा 11 वा सामना आज दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात कराचीतील राष्ट्रीय स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. इंग्लंड संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा संघ आपला सन्मान वाचवण्यासाठी खेळेल. दरम्यान, नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण इंग्लंड संघ 38.2 षटकांत फक्त 179 धावांवर आटोपला. यासह, दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
The lowest total of this year's Champions Trophy 😱https://t.co/oDatRR942K | #SAvENG pic.twitter.com/hCevNATobQ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 1, 2025
England are all out for 179 and South Africa’s place in the Champions Trophy semi-finals is confirmed ✅ pic.twitter.com/9plV0ZHuvu
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 1, 2025
इंग्लंडकडून स्टार फलंदाज जो रूटने सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान, जो रूटने 44 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार मारला. जो रूट व्यतिरिक्त, अनुभवी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 25 धावा केल्या. (हे देखील वाचा: IND vs NZ Champions Trophy 2025 Pitch Report: दुबईमध्ये रंगणार भारत आणि न्यूझीलंड सामना, खेळपट्टी गोलंदाज की फलंदाज कोण करणार कहर? वाचा पिच रिपोर्ट)
दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॉन्सन आणि विआन मुल्डर यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. मार्को जॉन्सन आणि वियान मुल्डर व्यतिरिक्त केशव महाराजने दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 50 षटकांत 180 धावा कराव्या लागतील. दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करू इच्छितो.
(The above story first appeared on LatestLY on Mar 01, 2025 05:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

