तिसऱ्या टी-20 नंतर Suryakumar Yadav आणि Tilak Verma यांचा पहा मजेदार व्हिडिओ, BCCI ने केला शेअर
तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. 5 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज 2-1 ने पुढे आहे. उर्वरित 2 सामने अमेरिकेत होणार आहेत. या सामन्यात सूर्यकुमार यादवने (SuryaKumar Yadav) 44 चेंडूत 83 धावांची विजयी खेळी केली. त्याचवेळी या सामन्यात तिळक वर्माने (Tilak Verma) त्याला साथ दिली.
Surya-Tilak Funny Video: गयानाच्या जॉर्जटाउन येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. 5 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज 2-1 ने पुढे आहे. उर्वरित 2 सामने अमेरिकेत होणार आहेत. या सामन्यात सूर्यकुमार यादवने (SuryaKumar Yadav) 44 चेंडूत 83 धावांची विजयी खेळी केली. त्याचवेळी या सामन्यात तिळक वर्माने (Tilak Verma) त्याला साथ दिली. तिळकने 49 धावांची नाबाद खेळी खेळली. दरम्यान, तिसरा टी-20 सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोन्ही खेळाडू मॅचबद्दल आपापसात बोलताना दिसत आहेत. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. सूर्या तिळकला प्रश्न विचारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)