IND W vs ENG W 2nd T20 Live score Update: इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले, संपूर्ण संघ केवळ 80 धावांवरच मर्यादित
नाणेफेक हारून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा डाव 16.2 षटकात केवळ 80 धावांवरच मर्यादित राहिला. टीम इंडियाकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 30 धावा केल्या. इंग्लंडकडून शार्लोट डीन, लॉरेन बेल, सोफी एक्लेस्टोन आणि सारा ग्लेन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. बुधवारी या मैदानावरील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. या मालिकेत इंग्लंड 1-0 ने आघाडीवर आहे. जर टीम इंडिया हा सामना हरली तर ती मालिका गमावेल. अशा परिस्थितीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघ पुनरागमनाकडे डोळे लावून बसला आहे. दरम्यान, इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा डाव 16.2 षटकात केवळ 80 धावांवरच मर्यादित राहिला. टीम इंडियाकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 30 धावा केल्या. इंग्लंडकडून शार्लोट डीन, लॉरेन बेल, सोफी एक्लेस्टोन आणि सारा ग्लेन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 20 षटकात 81 धावा करायच्या आहेत. (हे देखील वाचा: Team India: एकदिवसीय विजयात या भारतीय फलंदाजांनी या वर्षी 1 हजारहून अधिक केल्या धावा, पाहा आश्चर्यकारक आकडेवारी)