NZ vs SL ICC World Cup 2023 Live Score Update: श्रीलंकेच्या फलदाजांची पुन्हा बोंब, न्युझीलंडसमोर ठेवले 171 धावाचे लक्ष्य
उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी न्यूझीलंडला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. या स्पर्धेत न्यूझीलंडने 8 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. न्यूझीलंडचे 8 गुण आहेत. श्रीलंकेचा संघ बाहेर पडला आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 41 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका (NZ vs SL) यांच्यात बेंगळुरू येथे खेळला जात आहे. उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी न्यूझीलंडला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. या स्पर्धेत न्यूझीलंडने 8 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. न्यूझीलंडचे 8 गुण आहेत. श्रीलंकेचा संघ बाहेर पडला आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ 46.4 षटकांत केवळ 171 धावांवरच मर्यादित राहिला. श्रीलंकेसाठी सलामीवीर कुसल परेराने सर्वाधिक 51 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला 50 षटकात 172 धावा करायच्या आहेत.