Shubman Gill Double Century: शुभमन गिलने नवा विक्रम रचला, द्विशतक करणारा पाचवा भारतीय ठरला
टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने बुधवारी हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी करताना इतिहास रचला.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाला या सामन्यात विजयाने मालिका सुरू करायची आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने बुधवारी हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी करताना इतिहास रचला. शुभमन गिलने डावाच्या 49व्या षटकात लोकी फर्ग्युसनच्या चेंडूवर सलग तीन षटकार ठोकून 145 चेंडूत पहिले द्विशतक पूर्ण केले. गिल 149 चेंडूत 208 धावा करून बाद झाला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल हा पाचवा भारतीय आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा (तीन), वीरेंद्र सेहवाग आणि ईशान किशन यांनी हा पराक्रम केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)