IND vs WI 5th T20I Live Score Update: भारताला दुसरा धक्का 17 धावांवर, यशस्वी जैस्वाल नंतर शुभमनही बाद
T20I मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना आज सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळला जात आहे.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील T20I मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना आज सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळला जात आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने चौथ्या T20I सामन्यात दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिज संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियासाठी हा सामना करा किंवा मरोपेक्षा कमी नाही. कारण आज भारतीय संघ हरला तर पाच सामन्यांची मालिका गमावेल. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णायक सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुभमन गिल 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम इंडियाचा स्कोर 17/2.