Sanju Samson Catch Video: आशिया चषकापूर्वी संजू सॅमसनने राहुल-किशनला दिले आव्हान, विकेटकीपिंग करताना पकडला आश्चर्यकारक झेल; पहा व्हिडिओ
सामन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजचा संघ खूपच आक्रमक दिसत होता. दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने काइल मेयर्सचा शानदार झेल घेतला.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्यातील चौथा T20 (IND vs WI 4th T20) फ्लोरिडा, USA येथे खेळला जात आहे, जेथे वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान दुसऱ्याच षटकात स्टार यष्टीरक्षक संजू सॅमसनने (Sanju Samson) आश्चर्यकारक झेल टिपला. यासह त्याने केएल राहुल आणि ईशान किशन यांना आशिया कप 2023 आधी आव्हान दिले आहे. वास्तविक, सामन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजचा संघ खूपच आक्रमक दिसत होता. दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने काइल मेयर्सचा शानदार झेल घेतला. त्याच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)