RR vs LSG, IPL 2024 4th Match Toss Update: राजस्थानने लखनौविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
या मोसमातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असून दोन्ही संघांना विजयाने सुरुवात करायची आहे. या सामन्यात अनेक स्टार खेळाडू भाग घेणार आहेत.
RR vs LSG, IPL 2024 4th Match: आज आयपीएल 2024 च्या चौथ्या (IPL 2024) सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी (RR vs LSG) होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या मोसमातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असून दोन्ही संघांना विजयाने सुरुवात करायची आहे. या सामन्यात अनेक स्टार खेळाडू भाग घेणार आहेत. दरम्यान, राजस्थानने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल