SRH vs KKR IPL 2024 Final Live Streaming: फायनलमध्ये कोलकाता आणि हैदराबाद आमनेसामने, एका क्लिकवर येथे पाहा लाइव्ह स्ट्रीमिंग

या सामन्याद्वारे केकेआर तिसरे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल आणि हैदराबाद दुसरे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल.

SRH vs KKR (Photo Credit - X)

SRH vs KKR IPL 2024 Final: आयपीएल 2024 चा अंतिम सामना (IPL 2024 Final) रविवार, 26 मे रोजी म्हणजे आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळला जाणारा हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. विजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघांना आपापल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरायचे आहे. या सामन्याद्वारे केकेआर तिसरे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल आणि हैदराबाद दुसरे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता. (हे देखील वाचा: IPL Final 2024 Google Doodle: ‘आयपीएल’चा अंतिम सामना, कोलकाता अन् हैदराबाद भिडणार; गुगलकडून खास डूडल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)