IND vs SA Test Series 2023: दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी आव्हानासाठी भारतीय फिरकी जोडी सज्ज, अश्विन-जडेजाने शेअर केला फोटो

घातक आणि अनुभवी फिरकी जोडी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचाही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

R Ashwin And Jadeja (Photo Credit - Twitter)

IND vs SA Test Series 2023: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून (IND vs SA Test Series) सुरू होणार आहे. सेंच्युरियनमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाने इंट्रा स्क्वॉड मॅचमध्येही सहभाग घेतला होता. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी तयारीला अंतिम रूप दिले. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत शतके झळकावली. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी आव्हानासाठी गोलंदाजही सज्ज झाले आहेत. घातक आणि अनुभवी फिरकी जोडी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचाही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी म्हणजेच 22 डिसेंबर रोजी झालेल्या इंट्रा स्क्वॉड सामन्यात दोन्ही खेळाडू सराव जर्सीमध्ये एकत्र दिसले. रवी अश्विनने जडेजासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. कसोटीपूर्वी भारतीय फिरकी जोडीने सराव केला, ज्याची माहिती खुद्द अश्विनने शेअर केली आहे. अश्विनने इंस्टाग्रामवर ट्विट केलेल्या फोटोला 'टेस्ट मॅच प्रेप' असे कॅप्शन दिले आहे. (हे देखील वाचा: IND vs SA Test Series 2023: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराट कोहली करु शकतो नवीन विक्रम, सेहवाग - द्रविडला टाकणार मागे)

Tags

Aiden Markram Akash Deep Andile Phehlukwayo Arshdeep Singh Avesh Khan Axar Patel David Miller Heinrich Klaasen India Keshav Maharaj KL Rahul Kuldeep Yadav Kyle Verreynne Lizaad Williams Mihlali Mpongwana Mukesh Kumar Nandre Burger Ottniel Baartman Rajat Patidar Rassie van der Dussen Reeza Hendricks Rinku Singh Ruturaj Gaikwad Sai Sudharsan Sanju Samson South africa Tabraiz Shamsi Tilak Varma Tony de Zorzi Washington Sundar Wiaan Mulder Yuzvendra Chahal अक्षर पटेल अँडिले फेहलुक्वायो अर्शदीप सिंग आकाश दीप आवेश खान ऋतुराज गायकवाड एडन मार्कराम एम ओटनील ओटनील बार्टमॅन ओटनील बार्टेन्म काइल वेरेन काइल वेरेने कुलदीप यादव केएल राहुल केशव महाराज टिळक वर्मा टोनी डी झोर्झी डेव्हिड मिलर तबरेझ शम्सी दक्षिण आफ्रिका नांद्रे बर्गर भारत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मुकेश कुमार युझवेंद्र चहल रजत पाटीदार रिंकू सिंग रीझा हेंड्रिक्स रुतुराज गायकवाड रॅसी व्हॅन डर डुसेन रॅसी व्हॅन डेर ड्युसेन लिझाद विल्यम्स वायआन मुल्डर विआन मुल्डर वॉशिंग्टन सुंदर संजू सॅमसन साई सुदर्शन हेनरिक क्लासेन