IND vs ENG 2nd Test Live Streaming: विशाखापट्टणम कसोटीला थोड्याच वेळात होणार सुरुवात, जाणून घ्या कधी अन् कुठे घेणार सामन्याचा आनंद
इंग्लंड संघाने पहिली कसोटी 28 धावांनी जिंकली होती. बेन स्टोक्सच्या संघाने भारताला आपल्या चालीत अडकवले होते. आता भारतीय संघाला विशाखापट्टणममध्ये विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधायची आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सकाळी 9.30 वाजता सुरुवात होईल.
IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd Test) खेळवला जाणार आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी गमावल्यानंतर टीम इंडियाची नजर मालिकेत पुनरागमनाकडे असेल. इंग्लंड संघाने पहिली कसोटी 28 धावांनी जिंकली होती. बेन स्टोक्सच्या संघाने भारताला आपल्या चालीत अडकवले होते. आता भारतीय संघाला विशाखापट्टणममध्ये विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधायची आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सकाळी 9.30 वाजता सुरुवात होईल. तर 9 वाजता नाणेफेक होईल. तुम्हाला हा सामना थेट पहायचा असेल, तर तुम्ही नेटवर्क-18 च्या स्पोर्ट्स चॅनलवर टीव्हीवर पाहू शकता. तसेच तुम्ही भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा आनंद तुमच्या मोबाईलवर घेऊ शकता. हा सामना Jio TV वर मोबाईल आणि स्मार्ट टीव्हीवर अगदी मोफत पाहू शकता. (हे देखील वाचा: Sarfaraz Khan Interview: 'मी भारतासाठी खेळू शकेन, अशी अपेक्षा नव्हती,' निवड झाल्यानंतर सरफराज खान झाला भावूक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)