India Beat England: तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडला हरवले, सायका-श्रेयंकाने केली शानदार गोलंदाजी
तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पाच विकेट्सने पराभव केला. इंग्लंडने ही मालिका 2-1 ने जिंकली. तत्पूर्वी, इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने निर्धारित 20 षटकात 126 धावा केल्या.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पाच विकेट्सने पराभव केला. इंग्लंडने ही मालिका 2-1 ने जिंकली. तत्पूर्वी, इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने निर्धारित 20 षटकात 126 धावा केल्या. इंग्लंडकडून कर्णधार हीदर नाइटने सर्वाधिक 52 धावा केल्या. टीम इंडियाकडून सायका इशाक आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 19 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी सलामीवीर स्मृती मानधनाने सर्वाधिक 48 धावा केल्या. इंग्लंडकडून फ्रेया केम्प आणि सोफी एक्लेस्टोनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. (हे देखील वाचा: West Indies Cricket Team Central Contract: वेस्ट इंडिजने सेंट्रल कॉन्ट्रैक्ट केला जाहीर, निकोलस पूरनसह 3 खेळाडूंनी ऑफर नाकारली)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)