West Indies Cricket Team Central Contract: वेस्ट इंडिजने सेंट्रल कॉन्ट्रैक्ट केला जाहीर, निकोलस पूरनसह 3 खेळाडूंनी ऑफर नाकारली

वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार निकोलस पूरन, जेसन होल्डर तसेच काईल मेयर्स यांनी ऑफर केलेला करार नाकारला आहे, परंतु हे तिन्ही खेळाडू करार कालावधीत T20I सामने खेळण्यास पात्र आहेत.

West Indies Cricket Team Central Contract: वेस्ट इंडिजने सेंट्रल कॉन्ट्रैक्ट केला जाहीर, निकोलस पूरनसह 3 खेळाडूंनी ऑफर नाकारली
निकोलस पूरन (Photo Credit: PTI)

West Indies Cricket: क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) ने 2023-24 साठी केंद्रीय करार मिळालेल्या खेळाडूंची नावे उघड केली आहेत. पुरुष संघातील 14 तर महिला संघातील 15 खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले. तथापि, वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार निकोलस पूरन, जेसन होल्डर तसेच काईल मेयर्स यांनी ऑफर केलेला करार नाकारला आहे, परंतु हे तिन्ही खेळाडू करार कालावधीत T20I सामने खेळण्यास पात्र आहेत. वेस्ट इंडिज संघासाठी उपलब्ध असतील. निवड समितीच्या शिफारशी आणि संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर 2022 ते 2023 या कालावधीतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर करार देण्यात आले आहेत. वेस्ट इंडिजच्या पुरुष संघाच्या चार खेळाडूंना प्रथमच केंद्रीय करार मिळाला आहे, ज्यात डावखुरा फिरकीपटू गुडाकेश मोती, उजव्या हाताचा फलंदाज केसी कार्टी, डावखुरा फलंदाज तेजनारिन चंद्रपॉल आणि अॅलिक अथान्झे यांचा समावेश आहे. महिला संघाच्या अष्टपैलू खेळाडू झायडा जेम्स आणि शेनेटा ग्रिमंड यांनाही प्रथमच केंद्रीय करार मिळाला आहे. (हे देखील वाचा: IND vs SA 1st T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2023 10:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).