IND vs WI 4th T20 Live Toss Update: चोथ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघांची प्लेइंग-11
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे. याआधी तीन टी-20 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजने त्यांच्याच भूमीवर 2-1 अशी आघाडी घेतली होती. आता चौथ्या सामन्यात टीम इंडिया मालिकेत बरोबरी करण्यासाठी उतरणार आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग-11
भारत : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज : ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, ओडेन स्मिथ, अकिल हुसेन, ओबेद मॅककॉय.