IND vs WI 5th T20 Live Toss Update: निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा घेतला निर्णय
ही मालिका सध्या 2-2 अशी बरोबरीत आहे.
आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवला जात आहे. ही मालिका सध्या 2-2 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत हा निर्णायक सामना जिंकणारा संघ टी-20 मालिकेवरही कब्जा करेल. पहिल्या दोन T20 मध्ये पराभवानंतर भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करत तिसरा आणि चौथा T20 जिंकला. आता टीम इंडियाची नजर मालिका जिंकण्यावर असेल. दरम्यान भारताने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारत : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार
वेस्ट इंडिज : ब्रॅंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)